या कार्यशाळेस एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (यूडीसीपीआर) तयार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सेवानिवृत्त सहसंचालक, नगररचना विभाग- प्रकाश भुक्ते, सहसंचालक पुणे विभाग पुणे -अविनाश पाटील, सहसंचालक पुणे महानगरपालिका सुनील मरळे व सेवानिवृत्त उपसंचालक, नगररचना विभाग संजय सावजी यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यशाळेसाठी नगररचना विभागाचे महाराष्ट्र राज्याचे संचालक सुधाकर नागनुरे, संचालक श्रीरंग लांडगे व संचालक नोरेश्वर शेंडे, निवृत्त संचालक राजन कोप, कमलाकर अकोडे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांजि प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यशाळेस क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार जितूभाई ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नगररचना नाशिक विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे व क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन तसेच सर्व सभासद प्रयत्नशील आहेत.
युनिफाइड डीसीपीआरबाबत नगररचना विभागातर्फे कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:34 AM