सिन्नर : रात्रीचा दिवस करीत तब्बल ५० दिवस श्रमदानाच्या माध्यमातून घाम गाळणाºया जलमित्रांच्या मदतीला वरुणराजा धावून आला आहे.शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे जलमित्रांनी तयार केलेले समतल चर, डोंगरावरील खोलगट चर, शेततळे, मातीबांध, दगडी बांध, जाळी बंधारे, सिमेंट बंधारे आणि पाझर तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोनांबे परिसरात सुरू असलेल्या संततधारेने पानी फाउण्डेशनच्या कामाचे सार्थक झाले असून, सर्वच शिवार पाण्याने आबादानी झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.वडझिरे, हरसुले, धोंडबार या गावातील स्ट्रक्चरमध्येही संततधारेने पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविण्याचे ध्येय पानी फाउण्डेशनच्या कामामुळे साध्य होताना दिसत आहे. टंचाईचा सामना करणाºया या गावांमध्ये भविष्यात येणारी आबादानी इतर गावांना खºया अर्थाने प्रेरणादायी ठरणार आहे. गेल्यावर्षीही पानी फाउण्डेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागली होती; मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता. यंदाच्या पावसाने हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर आनंदाची लकेर उमटण्याची अपेक्षा आहे. एप्रिल आणि मे महिन्यातीलतीव्र उष्णतेच्या लाटेत जीवनसुखकर करण्यासाठी जलमित्रांनी केलेल्या कष्टाला वरुणराजाने संततधार बरसण्यास प्रारंभ करून साथ दिली आहे.सात गावे ठरली अंतिम परीक्षणासाठी पात्र १२४ गावांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० गावांतील नागरिकांनी प्रशिक्षण घेतले. ५० गावे श्रमदानात प्रत्यक्ष सहभागी झाली. त्यापैकी कोनांबे, वडझिरे, पाटोळे, हिवरे, आशापूर, चास आणि हरसूले ही गावे कामांच्या पडताळणीसाठी निवडली. तर कोनांबे, वडझिरे, पाटोळे आणि हिवरे ही ४ गावे अंतिम परीक्षणास पात्र ठरली. गेल्या वर्षी वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कोनांबे गावाने यंदा ८८ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे ते राज्यस्तरीय स्पर्धेत आहे. तर वडझिरे, पाटोळे आणि हिवरे यांच्यात तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकासाठी प्रचंड चुरस आहे.प्रत्येक गावात पर्जन्यमापक महसूल विभागाकडून अंदाजे नोंदविली जाणारी पावसाची आकडेवारी शेतकºयांच्या मुळावर उठते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी पानी फाउंडेशनने साध्या प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करून पर्जन्यमापक बसविले आहेत. त्याचे रीडिंग घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात एका व्यक्तीची पर्जन्य नोंदीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे पाणी फाउंडेशनच्या समन्वयक सुषमा मानकर, नागेश गरड, प्रवीण डोणगावे यांनी सांगितले. वॉटरकप स्पर्धेत श्रमदान करीत ग्रामस्थांनी मोठे काम उभे केले. टंचाईवर मात करण्यासाठी सरसावलेल्या बायाबापडे आणि चिमुकल्यांचे कष्ट सार्थकी लागले आहेत. गावोगावी तयार करण्यात आलेले स्ट्रक्चर पावसाने तुडुंब भरले असून, श्रमदानाचे खºया अर्थाने चीज झाले.-सुषमा मानकर,समन्वयक, पानी फाउण्डेशन
श्रमदानाला वरुणराजाची साथ; शिवार झाले पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:43 PM
सिन्नर : रात्रीचा दिवस करीत तब्बल ५० दिवस श्रमदानाच्या माध्यमातून घाम गाळणाºया जलमित्रांच्या मदतीला वरुणराजा धावून आला आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे जलमित्रांनी तयार केलेले समतल चर, डोंगरावरील खोलगट चर, शेततळे, मातीबांध, दगडी बांध, जाळी बंधारे, सिमेंट बंधारे आणि पाझर तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोनांबे परिसरात सुरू असलेल्या संततधारेने पानी फाउण्डेशनच्या कामाचे सार्थक झाले असून, सर्वच शिवार पाण्याने आबादानी झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.
ठळक मुद्देसिन्नर : रात्रीचा दिवस करून राबलेल्या कष्टकऱ्यांच्या कामाचे सार्थक