एकलहरे : येथील अधिकारी मनोरंजन केंद्रात एकदिवसीय बागकाम कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन कुंडीतील रोपाला मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांचे हस्ते पाणी घालून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य अभियंता सुनील इंगळे, देवेंद्र माशाळकर, अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, शशांक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेस नागपूर येथील कृषितज्ज्ञ डॉ. अमित पोफळी यांनी टेरेस, किचन गार्डन यांच्या माध्यमातून भाजीपाला करण्यासाठी लागवड करण्याची तयारी, त्यासाठी लागणारी सामग्री याची माहिती दिली. एका कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला घरच्या घरी पिकविता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांंची लागवड करून रासायनिक खते, औषधे न वापरता शुद्ध व निर्जंतूक भाजीपाला घरी करू शकतो. किचन गार्डनच्या कामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते. ताण-तणावमुक्त जीवन जगण्याबरोबर एकटेपणा दूर करता येतो, असे डॉ. पोफळे यांनी सांगितले. तसेच बियाण्यांपासून रोपे बनविणे, फुलझाडे, फळझाडांचे कलम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, विविध रोगांपासून रोपांचे संरक्षण याविषयी डॉ. पोफळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयश्री गोरे व आभार राहुल शेळके यांनी मानले.
एकलहरे येथे अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:57 AM