याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब ढेपले यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त मार्गदर्शन करताना या आजारावर जगात कोणतेही औषध उपलब्ध नाही, प्रतिबंध हाच उपाय असून, समाजातल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या व्यक्तींपर्यंत याची माहिती पुरविण्याचे काम आपणा सर्वांचे आहे असे मनोगतात व्यक्त केले.मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे यांनी, नववी व दहावी या वर्गांसाठी एड्स हा नवीन विषय शासनाने समाविष्ट केला असून, त्याविषयी पालक व समाजाला जनजागृती करण्याचे आवाहन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केले.याप्रसंगी उपमुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, पर्यवेक्षक शांताराम गायकवाड, नंदकुमार न्याहारकर, भागवत गवळी, सुरेश शेटे, राजेंद्र शिंदे, विवेक सोनगडकर, रावसाहेब शेलार, बाळासाहेब मोरे, आत्माराम शिंदे, रेखा देशमाने, रूपाली जाधव, दीपाली गडाख, प्रांजल आथरे, लता आहेर, चंपावती जाधव, भाग्यश्री पगार, महेश जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विशाल पगारे यांनी केले तर आभार परसराम शेडगे यांनी मानले.
माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक एड्स निर्मूलन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 10:56 PM
ओझर : येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे होते.
ठळक मुद्देपालक व समाजाला जनजागृती करण्याचे आवाहन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केले.