सायखेडा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात वाड्यावस्तीत विकसीत व अद्ययावत तंत्रज्ञान पोहचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. गोदाकाठ परीसरात स्वतंत्र विविध कंपन्याचे मोबाईल रेंजसाठी टॉवर उपलब्ध असून मोबाईल धारकांना पुरेसा रेंज मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त झाले आहे.गेल्या काही महिन्यात मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरश: सर्वच पातळ्यांवर मेटाकुटीला आणले आहे. ‘फोर जी’ सेवा असताना सायखेडा परीसरात मोबाईलला टूजी किंवा थ्री जी रेंज मिळत आहे. इंटरनेटची परिस्थितीत तर याहून वाईट असून डिजिटल इंडियाचा बोऱ्या वाजला आहे. स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडविण्यासाठी एकाच टॉवरवर चार चार कंपन्यांचा संसार चालू आहे.कंपन्यांच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कोठेही तक्र ार केली. तरी त्याचाउपयोगनाही. परीसरात सध्या अनेक नामांकित कंपन्यांच्या मोबाईल सेवा कार्यरत आहेत. मात्र, यापैकी अपवाद वगळता बहूतेक कंपन्यांच्या सेवेचा येथे पूरता फज्जा उडाला आहे.मागील कित्येक महिन्यांपासून बीएसएनएलपासून अन्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी गुडघे टेकले आहेत. त्यामुळे तालुक्यात मोबाइल नेटवर्क सेवा सुविधानाही. येथील इंटरनेट सेवेसह मोबाइल रेंज काही महिन्यांपासून गायब झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.कित्येकदा रेंजच गायब असते, रेंज असेल तर लाइन व्यस्त असतात. त्यामुळे बराचकाळ कॉल लागत नाही. मधूनच नेटवर्क गायब होते, नाही तर कॉलमध्ये कंजेक्शन ठरलेलेच. यातूनही जर कॉल लागला तर बोलत असतानाच तो बंदही पडतो.यासोबतच इंटरनेट सेवामधील अवस्थाही यापेक्षा दयनीय झाली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सातत्याने मोबाईल यंत्रणा ठप्प होऊ लागली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्षच होते आहे. मात्र, यावेळेला ग्राहकांत संतापाची लाट अन् मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.त्यामुळे संबधीत मोबाईल सेवा देणाºया टॉवर कंपनीने वेळीच कुचकामी यंत्रणेला सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.
एकाच टॉवरवर चार कंपन्यांचा संसार....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 2:36 PM
सायखेडा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात वाड्यावस्तीत विकसीत व अद्ययावत तंत्रज्ञान पोहचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. गोदाकाठ परीसरात स्वतंत्र विविध कंपन्याचे मोबाईल रेंजसाठी टॉवर उपलब्ध असून मोबाईल धारकांना पुरेसा रेंज मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त झाले आहे.
ठळक मुद्देसायखेडा : गोदाकाठ परीसरात मोबाईल रेंज नसल्याने ग्राहक हैराण