अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वि.वा. शिरवाडकर यांची जयंती जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षक अजहर खतीब होते.कार्यक्र माची सुरु वात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला व गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनी राजनंदिनी काळे व स्पर्शीता ढोले यांनी आपले भाषण सादर केले. यानंतर मराठी शिक्षिका शिर्मला पवार व प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी मराठी भाषा कशी जगात सुंदर व बोलण्यासाठी सोपी आहे, यावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणांत अजहर खतीब यांनी तात्यासाहेब शिरवाडकर यांचे मराठी भाषेत योगदान यावर भाष्य केले.याच दरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय वायू सेनेने पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान येथील अतिरेकी तळावर हल्ला करून जवळपास ३०० पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संपूर्ण विद्यालय परिसर टाळ्यांच्या गजराने व भारत मातेच्या जय जय काराने दुमदुमले होता.याप्रसंगी जालिंदर म्हस्के, माधुरी माळी, सुषमा सोनवणे, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, अमोल आहेर, शिवाजी झांबरे, प्रशांत बिवाल, रोहिदास ठाकरे, अमोल वडनेरे, चेतना माकूने, ममता खेरुड, पूनम घोंगाणे, सुनीता वडे, स्वाती कदम, योगिता हबीब, उमा हबीब, वैशाली बागुल, आलिया खान आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सुश्मिता देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना एंडाईत यांनी केले.(फोटो २८ अंदरसूल)
अंदरसुल येथे जागतिक मराठी भाषा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 7:37 PM
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वि.वा. शिरवाडकर यांची जयंती जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षक अजहर खतीब होते.
ठळक मुद्देभारत मातेच्या जय जय काराने दुमदुमले होता.