नाशिक : नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.२१) जागतिक संगीत दिन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने संगीताच्या प्रमुख रूपांचा आस्वाद देणारा ‘सौगात’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे.या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय गायन, मराठी लोकगीते, सुगम संगीत, हिंदी गाणी तसेच करावके या अभिनव प्रकाराचेही सादरीकरण केले जाणार आहे. नाशिकचे प्रमुख गायक या संगीत रजनीत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव शैलेश ढगे आणि संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने नाशिकच्या रसिकांना सर्व प्रकारचे भारतीय संगीत अनुभवता यावे, या उद्देशानेच या नि:शुल्क संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.गायकांचा सत्कार करणारसंगीत दिनानिमित्त संस्थेच्या वतीने गुणवान गायकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यात नाशिकची अभिनेत्री शीतल अहिरराव तसेच ज्युनिअर बच्चन नितीन चव्हाण हेदेखील त्यांच्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. यापुढे दरवर्षी अशा संगीत सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष फारूख पिरजादे, गोकुळ पाटील, रवी बाराथे, अॅना कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आॅर्केस्ट्रा संघटनेतर्फे जागतिक संगीत दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:04 AM