वणी : खोरीपाडा येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथील डॉ. राकेश सोनवणे तसेच पिंप्री आचला येथील रहिवासी, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद चौधरी, खोरीपाडा येथील पोलीस पाटील सम्राट राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कैलास खैरनार आदी उपस्थित होते.कार्यक्रमात कॉर्टिवा स्वयंसेवी संस्थेच्या गीता राणी यांनी शेतकरी बांधवांना पिकात फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सोनवणे यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे तसेच टोमॅटो पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतची माहिती दिली. जमधडे यांनी ह्यजागतिक मृदा दिनाचे महत्त्व तसेच माती परीक्षणाची गरजह्ण या विषयावर व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.आनंद चौधरी यांनी कृषी विभाग हा नेहमीच शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. कृषी विभागाने व कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे आपल्या शेतात खताचा वापर केला तर आपला वेळ व पैसा यांची बचत होईल, असे सांगितले.प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक उत्तम भुसारे यांनी केले. कार्यक्रमास अंबादास भरसट, गणपत भरसट, त्र्यंबक भरसट, उपसरपंच रामदास गायकवाड, लक्ष्मण राऊत, दत्तू राऊत, देविदास राऊत, नामदेव जोपळे, बाबुराव भरसट, रघुनाथ गवळी, यशवंत चव्हाण, जयराम राऊत, भारत देशमुख, काशिनाथ चव्हाण, पंडित राऊत, पंडित गवळी, कृषी सहायक अश्विनी भदाणे, कृषी सयक संदीपकुमार बोरवे, कृषिमित्र नामदेव गांगोडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
खोरीपाडा परिसरात जागतिक मृदा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 12:26 AM
वणी : खोरीपाडा येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ठळक मुद्देवणी : शेतकरी बांधवांना मागदर्शन