निकवेल : गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळे उपक्र म राबवून उत्साह साजरा करण्यात आला.आदिवासींचे दैवत क्र ांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ ९ आॅगस्ट हा दिवस राज्यात आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त बाळ गोपालासह सपूर्ण गावातील ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपुर्ण पंचक्र ोशीत श्री गुलाबराव महाराज मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली होती. निकवेल ते डांगसौंदाणे दरम्यान मोठी बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर आदिवासींचे दैवत क्र ांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या निमित्तने मान्यवरतर्फे बिरसा मुंडा जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यसनमुक्ती, ग्रामसुरक्षा व गावांतील विविध समस्यांवर विचार मंथन करण्यात आले.या प्रंसगी राकेश घोडे, सरपंच चित्रा मोरे, उपसरपंच मुरलीधर वाघ, ग्रा.पं सदस्य विजय वाघ, रामचंद्र मोरे, निलेश वाघ, विवेक सोनवणे, पोलीस पाटील विशाल वाघ, संजय सोनवणे, धमेंद्र महाजन, वाल्मिक अनारे, गुलाब मोरे, दिलीप अनारे, युवा वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
निकवेल येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:20 PM
निकवेल : गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळे उपक्र म राबवून उत्साह साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देनिकवेल ते डांगसौंदाणे दरम्यान मोठी बाईक रॅली काढण्यात आली.