येवला : तालुक्यातील खरवंडी, देवदरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांचे हस्ते आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे व सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले.आदिवासी कसत असलेल्या शेतातच आदिवासी दिन साजरा केला गेला. आदिवासी बांधवांना थेट शेतात जाऊन सभापती गायकवाड यांच्या हस्ते वनजमिनीचे पट्टे व सातबारा उताºयाचे वाटप करण्यात आले. प्रारंभी एकलव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कसत असलेल्या जमिनी नावावर व्हाव्यात यासाठी आदिवासी बांधव शासनाकडे पाठपुरावा करत होते. सभापती गायकवाड यांनी, वनसमितीच्या माध्यमातून कागदपत्रांंची पूर्तता व पाठपुरावा करून येवला, नांदगाव, निफाड, चांदवड, मालेगाव, देवळा या बिगरआदिवासी तालुक्यांतील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील १०७ आदिवासी बांधवांना वनजमिनी मिळाल्या आहेत.ज्या आदिवासी बांधवांच्या वनजमिनींचे प्रस्ताव अजून प्रलंबित आहे किंवा नामंजूर झाले आहेत अशा बांधवांना वनजमिनी मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे सभापती गायकवाड यांनी यावेळी सांगितले. तसेच आदिवासी बांधवांनी विविध शासकीय योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.याप्रसंगी बाळासाहेब मोरे, विष्णू मोरे, अर्जुन गोदावरे, भाऊसाहेब गोदावरे, संजय मोरे, संतोष मोरे, लक्ष्मण मोरे, विठ्ठल हंबरे आदी उपस्थित होते.
जागतिक आदिवासीदिनी वनजमिनींचे पट्टे, सातबारा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:20 PM
येवला : तालुक्यातील खरवंडी, देवदरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांचे हस्ते आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे व सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देयेवला तालुक्यातील १०७ आदिवासी बांधवांना वनजमिनी मिळाल्या