लासलगाव : अहोरात्र कष्ट करीत जीवनाचं रहाटगाडगं यंत्रवत ओढणाºया व घरातल्या कर्त्या पुरुषाइतकीच मानपाठ एक करीत काबाडकष्ट करणाºया हजारो कष्टकरी महिलांना आज ‘जागतिक महिला दिनी’ही प्रतवारी करणे सुटलेच नाही. जागतिक महिला दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम झाले. कर्तबगार महिलांचा सन्मान कार्यक्र म होताना दिसले; परंतु लासलगाव येथील कांदा खळ्यावर काम करणाºया नारीशक्तीला आजच्या महिला दिनीदेखील काम चुकले नाही. अगदी भल्या पहाटे उठून घरातील बाया, बापडे व लहानगे यांच्या भाकरी थापून व जेवण बनवून या महिला गेली अनेक दशके पायी तर आता वाहनाने लासलगाव येथील कांदा खळ्यावर कामाला येत असतात. निफाड, येवला व चांदवड या तीन तालुक्यांतील सुमारे पंधरा-वीस गावांतील महिला दिवसभर कांदा प्रतवारी करून कांदा गोण्यात भरून तो देशात वा परदेशात रवाना करण्यासाठी तयार करतात. हा महिलांच्या कामाचा विशेष भाग आहे. उच्चशिक्षण घेतलेल्या जमणार नाही अशी प्रतवारी करण्यात या महिला माहीर आहेत. काही महिला दिवस पाळीनंतर रात्रपाळी करून घरी परततात. अवघी चार-पाच तासांची झोप होत नाही तोच त्यांच्या नशिबी भल्या पहाटे उठून कुटुंबाचा स्वयंपाक करणे, रोजचे अंगवळणी पडून गेलेलं आहे. मिळणारी मजुरी हातात पडली की, रविवारच्या आठवडे बाजारात धान्य खरेदी करून गिरणीतच दळण करीत. त्या आठवडे बाजारात मोठ्या लगबगीने बाजार करून त्या घरी परततात. त्याच दिवशी भत्ता अगर गोडधोड त्यांच्या नशिबी. कांदा कापल्यानंतर डोळ्यात पाणी येते हा अनुभव आहे. परंतु कांद्यासमोर दिवस-रात्र भर उन्हात काम करणाºया या महिलांना कांदा पिकांची प्रतवारी हीच आपली कष्टाची भाकरी आहे. जागतिक महिलादिनीही त्या याच कामात व्यस्त होत्या. त्यांना या दिनाचा गंधही नव्हता.
जागतिक महिला दिन : ‘त्यांच्या’ गावीही नाही कांदा खळ्यावर ‘कष्टाची भाकर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:06 AM
लासलगाव : अहोरात्र कष्ट करीत जीवनाचं रहाटगाडगं यंत्रवत ओढणाºया व घरातल्या कर्त्या पुरुषाइतकीच मानपाठ एक करीत काबाडकष्ट करणाºया हजारो कष्टकरी महिलांना आज ‘जागतिक महिला दिनी’ही प्रतवारी करणे सुटलेच नाही.
ठळक मुद्देनारीशक्तीला आजच्या महिला दिनीदेखील काम चुकले नाहीकांदा पिकांची प्रतवारी हीच कष्टाची भाकरी