नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे सोमवारपासून (दि.२२) सुरू होणाऱ्या विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रथमच जिल्ह्यामध्ये येत आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या संमेलनासाठी देशभरातून हजारोंचा जनसागर लोटल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
जगात अहिंसेचा संदेश देण्यासाठी मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरममध्ये विश्वशांती अहिंसा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सपत्निक दुपारी साडेतीन वाजता हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. कार्यक्र मास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाने चोख सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. संमेलनस्थळापासून दक्षिणेला सातशे मीटर अंतरावर राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. वाहने येण्या-जाण्यासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात आला असून, बुलेटप्रूफ वाहने जातील या क्षमतेचे साडेतीन मीटर रु ंदीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सातशे पोलीस कर्मचारी व शंभर पोलीस अधिकाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चारही बाजूने पाच किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी कर्मचाºयांना तैनात केले आहे. यामध्ये महिला कमांडोदेखील ठेवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त गुप्तवार्ता, गुन्हे अन्वेषण, स्थानिक गुन्हे शाखा यांची पथकेदेखील दाखल झाली आहेत. चार अग्निशमन बंब व जवान, दोन फिरते पोलीस स्टेशन, दोन दंगा नियंत्रण पथक, दोन फिरते दवाखाने, अद्ययावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.
राष्ट्रपती कोविंद यांचे स्वागत करण्याचा बहुमान मिळणे हा माझ्यासाठी जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण मानतो. राष्ट्रपतींच्या दौºयामुळे जैन तीर्थक्षेत्राबरोबरच साल्हेर-मुल्हेर किल्ले, दावल मलिक बाबा, शंकर महाराज, उद्धव महाराज, कपार भवानी माता या तीर्थक्षेत्रांचा नक्की कायापालट होईल, असा विश्वास वाटतो.बाळू पवार, सरपंच, मांगीतुंगी
राष्ट्रपती कोविंद या भूमीत येणार आणि त्यांचे स्वागत आमच्या हातून होणार ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा परिसर देवांची भूमी मानला जातो. राष्ट्रपती महोदयांनी याची दखल घेऊन या भागातील गावांमध्ये शासनाच्या सर्व योजना राबविल्यास या भूमीचा विकास होईल.इंदूबाई सोनवणे, सरपंच, ताहाराबाद
भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीमुळे मांगीतुंगीचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. केंद्र व राज्य शासनाने सहकार्य केल्यास मांगीतुंगी व परिसराचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच भिलवाड गावाचा आदर्श गावात समावेश करून शासनच्या विविध योजना राबविल्यास हा परिसर देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल.महेंद्र जैन, विश्वस्त
मांगीतुंगी येथे भगवान ऋ षभदेव यांच्या १०८ फू ट मूर्तीच्या सान्निध्यात साध्वी ज्ञानमती माता यांनी आयोजित केलेले विश्वशांती अहिंसा संमेलन आणि या संमेलनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती हा त्रिवेणी संगम आहे. या माध्यमातून संपूर्ण जगात विश्वशांतीचा संदेश जाणार आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्यामुळे या भागाच्या विकासालादेखील मोठी चालना मिळणार आहे.रवींद्र सोनवणे, सरपंच, दसवेल
सिद्धक्षेत्र मांगीतुंगी हे दिगंबर जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विश्व अहिंसा संमेलनाचे उद्घाटन होत आहे. या पवित्रस्थळी मोठ्या संख्येने जैनबांधव उपस्थित झाले आहे. हे अत्यंत प्राचीन क्षेत्र असून, सम्मेद शिखरजीनंतर हे महत्त्वाचे स्थान मानले जाते. आदरणीय ज्ञानमती माताजींच्या प्रयत्नातून येथे भगवान श्री ऋषभदेव यांची १०८ फुटी मूर्ती निर्माण करण्यात आली आहे. राष्टÑपतींची भेट ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यानिमित्त धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असून, जगभरातून मोठ्या संख्येने भाविक मांगीतुंगी येथे दाखल झाले आहेत.- सुमेरकुमार काले, अध्यक्ष, मांगीतुंगी दिगंबर जैन देवस्थान ट्रस्ट
भगवान ऋषभदेव यांची मूर्ती शांती-अहिंसाचा संदेश मांगीतुंगीमधून देत आहे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे या पवित्र भूमीत आगमन होणार आहे. त्यांच्या येण्याने शांती-अहिंसाच्या संदेशाला अधिकाधिक बळ मिळणार असून, संपूर्ण विश्वासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणारा आहे.-विजय जैन, मंत्री, मांगीतुंगी दिगंबर जैन देवस्थान ट्रस्ट
जैन समाजाचे सिद्धक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. राष्टÑपतींचे जैन धर्मीयांच्या वतीने शाही स्वागत केले जाणार आहे. राष्टÑपतींच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला मोठे वैभव लाभले आहे. हा सोहळा जागतिक स्तरावर विश्वशांती, अहिंसेचा संदेश देणारा ठरणार आहे. संपूर्ण देशाचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. प्रशासनासह देवस्थान ट्रस्टची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांसाठी निवास-भोजनाची व्यवस्था मांगीतुंगी येथे करण्यात आली आहे.- पारस लोहाडे, प्रसिद्धिप्रमुख, आयोजन समिती
विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंधरा हजारांहून अधिक भक्त ऋ षभदेवपूरम येथे दाखल झाले आहेत. भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण समितीच्या वतीने त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या संमेलनासाठी नाशिकसह इंदूर, भोपाळ, दिल्ली, हस्तिनापूर, मुरादाबाद, जयपूर, मुंबई, जळगाव, धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, येथून जैन भाविकांचे आगमन झाले आहे. काही भाविकांसाठी मालेगाव, नाशिक, वडाळीभोई, ताहाराबाद, सटाणा येथेही निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.