नाशिक : संस्कृत भाषा सभा व सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाकवी कालिदास दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात अंकुश जोशी यांनी महाकवी कालिदास यांच्यावर केलेली कविता सादर केली. ‘शृंगाराला कवेत घेऊनि अजरामर जो झाला कशी वर्णवू त्याची गाथा अगाध ज्याचा महिमा, भाषेलाही अपुल्या अंगणी ज्याने खेळविले. शाकुंतल अन् मेघदूताला त्याने आळविले... !’ या त्यांच्या कवितेलाही उपस्थितांनी दाद दिली. रमेश देशमुख यांनी सार्वजनिक वाचनालय आणि संस्कृत भाषा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महाकवी कालिदास दिनानिमित्त महाकवी कालिदासांचे रघुवंश या विषयावर व्याख्यान होणार असल्याचे सांगितले. यावेळी सरिता देशमुख व डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी संपादित केलेले भास –एक प्रयोगशील नाटककर या पुस्तकाच्या दोन प्रती सावानास देणगी स्वरुपात दिल्या. डॉ. नीलिमा कुलकर्णी यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती सिंधूताई जोशी यांनी कालिदास यांच्यावर लिहिलेली कालिदासाचे मनोगत ही कविता सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. अंकुश जोशी यांचा सत्कार नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी केले. मीनल पत्की यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहाय्यक सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, ॲड. भानुदास शौचे, शोभा सोनवणे, मीनल पत्की, डॉ. नीलिमा कुलकर्णी, अमित नागरे,सोनवणे, रूपाली झोडगेकर आदी उपस्थित होते.
फोटो
११सावाना कालिदास