नाशिक : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शस्त्रपुजनाचा मुहूर्त पोलीस आयुक्तालयाने साधला. येथील शस्त्रगारामधील शस्त्रांना झेंडूची फुले वाहून बॅण्ड पथकाच्या धूनवर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी आरती केली. पोलीस मुख्यालयात सोमवारी (दि.२६) सकाळी विवधप्रकारच्या बंदुका, रायफल, मशिनगन आदी शस्त्रे शस्त्रागारच्या वसरीमध्ये टेबलावर मांडण्यात आले होते. यावेळी शस्त्रांभोवती झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. पाण्डेय यांनी विधिवत पूजन करत शस्त्रांचे औंक्षण केले. यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त सिताराम गायकवाड यांनीही शस्त्रांना पुष्पांजली वाहिली. यावेळी उपिस्थत पुरोहितांनी विविध मंत्रोच्चार करत शंखध्वनी वाजविला.संकटकाळात पोलिसांची रक्षा करण्यासाठी शस्त्रे महत्त्वाची ठरतात. यामुळे शस्त्रे व्यवस्थित रहावी यासाठी पारंपरिक प्रथेनुसार तीथीच्या मुहुर्तावर शस्त्रांचे पूजन करण्यात आल्याचे पाण्डेय म्हणाले.दरम्यान, जनताभिमुख पोलीस गस्तीसाठी महासंचालक कार्यालयाकडून पोलीस आयुक्तालयाला चार नवी आकर्षक पध्दतीची गस्तीवाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये तीन बोलेरो व एक टीयुव्ही अशा चार वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचेही यावेळी पाण्डेय यांनी औंक्षण करुन श्रीफळ वाढविले. पोलीस महासंचालकांच्या पुढील आदेश प्राप्त होताच या वाहनांचे परिमंडळनिहाय वाटप करुन शहरातील रस्त्यांवर गस्तीसाठी आणले जातील असे चौगुले यांनी सांगितले.-
'खाकी'कडून शस्त्रांचे पूजन; पोलीस बॅन्डने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 2:08 PM
पाण्डेय यांनी विधिवत पूजन करत शस्त्रांचे औंक्षण केले. यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त सिताराम गायकवाड यांनीही शस्त्रांना पुष्पांजली वाहिली. यावेळी उपिस्थत पुरोहितांनी विविध मंत्रोच्चार करत शंखध्वनी वाजविला.
ठळक मुद्देदिपक पाण्डेय यांनी केली आरतीपोलिसांची रक्षा करण्यासाठी शस्त्रे महत्त्वाची ठरतात