बंडू खडांगळेलखमापूर : कोरोनाच्या महामारीमुळे जवळजवळ एक वर्षांपासून ग्रामीण भागात यात्रा -जत्रा बंद आहेत. परिणामी कुस्त्यांची दंगल व बक्षिसांची लयलूट थांबली आहे. कुस्त्या बंद असल्याने पहिलवानांना कसरतीसाठी खाद्यपदार्थाचा खर्च डोईजड होत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील हजारो पहिलवानांना कुस्त्यांच्या दंगलीची प्रतीक्षा लागली आहे.देवदेवता व ग्रामदेवतांच्या यात्रा- जत्रा साजरा करण्याची ग्रामीण भागात शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. प्रसाद साहित्य,मनोरंजन, खाद्यपदार्थ आदींच्या उलाढालीबरोबरच मनोरंजन म्हणून लोकनाट्य तमाशा व कुस्त्यांची दंगल यात्रांमुळे रंगत असते. जिल्ह्यात वर्षभर विविध भागांत, गावोगावी विविध देवदेवतांचा यात्रोत्सव लोकवर्गणीतून केला जातो. विशेषतः उन्हाळ्यात ग्रामदेवतांच्या ग्रामीण भागातील यात्रा- जत्रा भरतात. कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. ग्रामीण भागातील शेकडो पहिलवान विविध गावांच्या जत्रांमध्ये आपले कसब पणाला लावतात. साधारणपणे ५१ रुपयांपासून २१ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे असतात. काही ठिकाणी भांडी व विविध वस्तूंवर कुस्त्या लावल्या जातात. अनेक पहिलवान जिंकलेल्या पैशातून आपला खुराक भागवितात. नियमित व्यायामाबरोबर दूध, तूप, काजू, बदाम, मटण,मासे आदी खाद्यपदार्थ पहिलवान ताकद येण्यासाठी सेवन करतात. कुस्त्या बंद झाल्यामुळे पहिलवानही अडचणीत आले आहेत. काहींनी परिस्थितीअभावी नियमित व्यायाम बंद केला आहे.या गावांना होते कुस्त्यांची दंगल...कळवण, ओझर, वडाळीभोई, खेडगाव गणपती, पिंपळगाव वाखारी, देवळा, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, आंबेवाडी, मनमाड, नांदगाव, येवला, पाटोदा, लखमापूर, वलखेड, ढकांबे, नाळेगाव, आडगाव, भगुर, पानेवाडी, उगाव, नांदुर्डी, सावरगाव, खडकमाळेगाव, वसेवाडी, नैताळे, गाजरवाडी, कोठुरे आदी ठिकाणी कुस्तीचे नावाजलेले फड आहेत.वर्षभरापासून कुस्त्यांची दंगल बंद आहे. कुस्त्यांमध्ये ५१ रुपयांपासून ते २१ हजार रुपयांपर्यंत रोख स्वरूपाचे बक्षीस विजेत्या पहिलवानास दिले जाते. यावर अनेक पहिलवान आपली गुजरान करतात. परंतु, कुस्ती बंद झाल्याने याचा परिणाम पहिलवानाच्या मेहनतीवर होत आहे. शासनाने यात्रा,जत्रा सुरू केल्यास ग्रामीण भागातील पहिलवानांना पुन्हा कुस्तीची संधी मिळेल...भाऊसाहेब कडू, पहिलवान, सावरगाव.
ग्रामीण भागातील पहिलवानांना कुस्त्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 10:03 PM
लखमापूर : कोरोनाच्या महामारीमुळे जवळजवळ एक वर्षांपासून ग्रामीण भागात यात्रा -जत्रा बंद आहेत. परिणामी कुस्त्यांची दंगल व बक्षिसांची लयलूट थांबली आहे. कुस्त्या बंद असल्याने पहिलवानांना कसरतीसाठी खाद्यपदार्थाचा खर्च डोईजड होत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील हजारो पहिलवानांना कुस्त्यांच्या दंगलीची प्रतीक्षा लागली आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : गावोगावच्या यात्राबंदीने पहिलवानांची नाराजी