वटार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सव, पालखी मिरवणूक, विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ग्रामदैवत असलेले सावता महाराज यांची वटार येथे भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्वात मोठी कुस्ती मल्ल सुनील उडानकर (धुळे) व विजू गवळी (मालेगाव) यांच्यात सटाण्याचे नगरसेवक राकेश खैरनार यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी सरपंच कल्पना खैरनार, उपसरपंचजितेंद्र शिंदे, वसंत गवळी, संजय बिरारी, जिभाऊ खैरनार, प्रदीप खैरनार, वैभव गांगुर्दे, पोलीसपाटील किरण खैरनार, किसन शिंदे आदी उपस्थित होते.अनेक छोट्या-मोठ्या कुस्त्या रंगल्या होत्या त्यात बाहेर गावाहून आलेल्या पहिलवानांना सहभागी करून घेण्यात आले. यावेळी संतोष खैरनार, किशोर खैरनार, हरिश्चंद्र अहिरे, राजेंद्र खैरनार, रामकृष्ण खैरनार सोसायटीचे चेअरमन, बळवंत दशपुते, बापू बागुल, दादाजी खैरनार, सुरेश खैरनार,बारकू खैरनार, मोठाभाऊ खैरनार, संतोष खैरनार, चेतन गांगुर्डे, हरिश खैरनार, समाधान खैरनार, नीलेश बागुल, ताराचंद खैरनार, बापू शिंदे, सागर खैरनार, शरद खैरनार, जगदीश खैरनार आदींचा सहभाग होता.
वटारला रंगली कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:05 AM
वटार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सव, पालखी मिरवणूक, विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ग्रामदैवत असलेले सावता महाराज यांची वटार येथे भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देसंत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सव