नाशिक -होमिओपॅथी प्रवेशासाठी नीट परीक्षेत ११९ गुणांची अट घातलेली आहे. ही अट कशासाठी असा सवाल खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत उपस्थित करावा,यासाठी या विषयांशी संबंधिक प्रश्नांचे निवेदन होमिओपॅथी काउंसीलन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना इंग्रजीमध्ये लिहून द्यावे, म्हणजे त्यांना केंद्रातील संबधितांसमोर होमिओपॅथीचे प्रश्न मांडता येतील असा खोचक सल्ला आमदार विक्रम काळे यांनी होमिओपॅथी कौउंसीलचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे यांना दिला.महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई यांच्यातर्फे सोमवारी (दि. १९) राज्यस्तरीय चर्चाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या चर्चाचसत्राचे उद्घाटन महाराष्ट्रा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांनी केले. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, डॉ. धनाजी बागल, डॉ.अरुण भस्मे,डॉ. शांतीलाल देसरडा, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे आदि उपस्थित होते. याउद्घाटन सोहळयात बोलताना विक्रम काळे यांनी काढलेल्या चिमट्यांना प्रत्युत्तर देताना आपण मुंबई विद्याथ्यापीठातून पदव्युत्तर पदवी इंग्रजीमधून गेतली असून मराठी सह देशातील चार भाषा आपण बोलू शकतो त्यामुळे होमिओपॅथीचे प्रश्न कोणत्याही भाषेत मांडू शकतो असे सांगत होमिओपॅथी शाखेचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन हरिश्चंद्र चव्हाण यांनी यावेळी दिले. दरम्यान, लोकसभेत हिंदी अथवा इंग्रजीत प्रश्न मांडल्यास तो संबंधितांच्याही लक्षात येईल, त्यामुळे डॉ. भालचंद्र ठाकरे यांनी चव्हाण यांना अॅलोपॅथीच्या प्रश्नांविषयीचे निवेदन इंग्रजीतून लिहून द्यावे अशी कोपरखिळी आमदार विक्रम काळे यांनी लगावली होती. त्यावर आपण मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी इंग्रजीमधूनच घेतली असून मराठीसह देशातील चार भाषा आपल्याला चांगल्या बोलता येतात. त्यामुळे आपण कोणत्याही भाषेत होमिओपॅथी डॉक्टरांची बाजू सरकार दरबारी मांडू शकतो असे सांगत अॅलोपॅथीच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिले. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री दिपक सावंत स्वत: होमिओपॅथीचे तज्ज्ञ आहेत. त्यामुळे होमिओपॅथी परिषदेने आपल्या मागण्या त्यांच्यासमोरही मांडल्या असे आवाहन हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. मात्र होमिओप्रथीचे तज्ज्ञ आरोग्य मंत्री असून होमिओपॅथी शाखेच्या अडचणी कमी होत नसल्याच खंत डॉ. अरुण भस्मे यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विलास कांगणे यांनी केले. डॉ. नितीन गावडे यांनी आभार मानले.