नाशिक : गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे. विशेष म्हणजे बॅँकेनेदेखील चुकीच्या खाते क्रमांकाबाबत तहसील कार्यालयाला कळवूनही त्यात अजूनही सुधारणा करण्यात आली नसल्याने सर्वसामान्य लाभार्थी वेठीस धरले जात आहेत.गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांपैकी बागलाण तालुक्याचाही समावेश केला. शासनाच्या नियमाप्रमाणे दुष्काळी अनुदान जिल्ह्णाला प्राप्त झाल्यानंतर यंदा एप्रिल-मे महिन्यात दुष्काळी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मात्र सदर अनुदान वर्ग करताना अनेकांचे खाते क्रमांकच चुकल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयाने लाभार्थ्यांचे अनुदान बॅँक खातेक्रमांकासह बॅँकेत वर्ग केले मात्र त्यांना बॅँकेने चुकीच्या क्रमांकाबद्दल कळूनही अद्यापही त्यात सुधारणा करण्यात आली नसल्याचे समजते. लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पहिल्या टप्प्याचेच अद्याप अनुदान मिळाले नसल्याने दुसऱ्या टप्प्याचा प्रश्नच नसल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तहसील कर्यालयातून बॅँकेत, बॅँकेतून तहसील कार्यालयात आणि तहसील कार्यालयातून तलाठी कार्यालय अशी पायपीट करावी लागत आहे. तहसील कार्यालयाने तलाठी कार्यालयाकडे बोट दाखवून तलाठी कार्यालयातून दुरुस्ती करवून आणण्याच्या सूचना लाभार्थ्यांनी केलेल्या आहेत. या प्रकारामुळे मात्र वयोवृद्धांना गेल्या दोन महिन्यांपासून कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.कर्मचाऱ्यांचा असहकारतहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी हे ११ वाजता कामावर येत असल्याची तक्रार असून, दुपारी ३ ते ४ जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली काम ठप्प असल्याची तक्रारदेखील वंचित लाभार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे.असा कोणताही प्रकार घडलेला नाही. दुष्काळी अनुदान दोन टप्प्यांत आलेले आहे. पहिल्या टप्प्यात कोणतीही तक्रार नसताना दुसºया टप्प्यात तक्रार असण्याचे काही कारण नाही. ज्या काही त्रुटी होत्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.- जितेंद्र इंगळे, तहसीलदार, सटाणा
अनुदान चुकीच्या खात्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:36 AM