नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे येत्या १८ पासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, विभागातील २४३ केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे एक लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.बारावीची परीक्षा दि. १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ७५ हजार ३४३, धुळ्यातील ४४ केंद्रांवर २५ हजार २६४ , नंदुरबारमध्ये ७१ कें द्रांवर ४९ हजार ४०३ व जळगावात २४ केंद्रांवर १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
उद्या बारावीची परीक्षा; २४३ केंदे्र सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 1:23 AM