नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील यांनी दिली आहे. विशेष परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत अर्ज करण्याची संधी असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले असून, मंडळाने विभागातील चारही जिल्ह्यांत परीक्षा केंद्राचा आढावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. बारावीच्या परीक्षेचे हे अंतिम वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार असून, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे स्वतंत्रपणे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित वेळापत्रक परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून ७५ हजार ४५, धुळे २५ हजार २३३, जळगाव ४९ हजार ३४१ व नंदुरबार जिल्ह्यातून १६ हजार ४६२ असे एकूण १ लाख ६६ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहे. दरम्यान, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह अनेक खासगी क्लासेसचालकांनी अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनास सुरुवात केली असून, पालक व शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागण्याचा सल्ला दिला जात आहे.
नाशिक विभागातून १ लाख ६६ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 9:00 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील यांनी दिली आहे.
ठळक मुद्दे१८ फेब्रुवारीपासून सुरू होणार बारावीची परीक्षा विभागातून १ लाख ६६ हजार विद्यार्थी देणार परीक्षानाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थ्यांचा समावेश