जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ‘कॅन्वॉय’वर अतिरेक्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ साली जम्मू-काश्मीरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी भरदुपारी आत्मघाती हल्ला केल्याच्या घटनेने देश हादरुन गेला होता. या भ्याड हल्ल्यात भारताने आपले ४० सैनिक गमावले होते. रविवारी या हल्ल्यातील शहिदांच्या बलिदानाला दोन वर्षे पूर्ण झाली. शहिदांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडिया हळहळला. अनेकांनी व्हॅलेंटाईन दिनाचे सेलिब्रेशन बाजूला ठेवत आपल्या शूरवीर जवानांच्या शहिदांच्या स्मृती जागविल्या. व्हॉटस्ॲपचे स्टेटस, डीपींमध्ये सीआरपीएफच्या जवानांना अभिवादन करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांमध्येही पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच सोशल मीडिया त्या कटु हल्ल्याच्या आठवणींनी गहिवरला होता. ‘सीआरपीएफ’नेदेखील त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन शहिदांची छायाचित्रे अमर जवान ज्योतीसह पोस्ट करत शत:शत नमन केले. १४ फेब्रुवारी भारतासाठी ‘काळा दिवस’ ठरला होता. त्यादिनी भारताने आपले ४० शूरवीर जवान गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण हाेऊ नये, अशाही पोस्ट सोशल मीडियावर वाचण्यास मिळाल्या. तसेच भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआयएसएफ आदी सुरक्षा दलांच्या वतीने शहिदांना ट्विटरद्वारे अभिवादन करण्यात आले.
--इन्फो--
शायरीतून शहिदांच्या स्मृतींना वंदन
‘तुम्हारे शौर्य के गीत, कर्कश शोर में खोये नहीं, गर्व इतना था की हम देर तक रोये नहीं...’
‘सर झुके बस उस शहादत में जो शहीद हुये हमारी हिफाजत में...’
‘उन आंखो की दो बुंदो से लाखो सागर हारे होंगे, मेहंदी वाले हाथो ने जब अपने मंगलसुत्र उतारे होंगे...’ अशा अनेकविध शायरींमधून सीआरपीएफच्या शहिदांच्या स्मृती सोशल मीडियावर अनेकांनी ताज्या केल्या.
---
फोटो आर वर १४ पुलवामा नावाने सेव्ह केलेला आहे.
===Photopath===
140221\14nsk_2_14022021_13.jpg
===Caption===
पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना