चालू वर्षाच्या अगोदर हे दोन्ही ग्रह सुमारे आठ शतकांनी गुरू व शनिच्या महायुतीचा योग जुळून आला. शनि हा ग्रह सूर्याभोवती २९ वर्षानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि ‘गुरू’ला सुमारे १२ वर्षे लागतात. हे दोन्ही ग्रह जवळ आल्याचा केवळ पृथ्वीवरून भास होतो. संध्याकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत गुरू हा ग्रह शनिपेक्षा मोठा आहे. तेजोवलय गुरूचे अधिक प्रखरपणे सोमवारी दिसून आल्याचे हौशी आकाश निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले. यानंतर असा महायुतीचा योग पुन्हा १५ मार्च २०८० साली जुळून येणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून फलज्योतिष या शोषण व फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धेला छेद देण्याच्या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बोरगड म्हसरूळ येथील जाधव यांच्या निवासस्थानावरून शनि, गुरू यांची महाकाय युती टेलिस्कोप, दुर्बिणीच्या साहाय्याने दाखविण्यात आली. वडाळा रोडवरील अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या आकाशगंगा निरीक्षण केंद्रातून काही विद्यार्थी व पालकांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, गिरीश पिंपळे, डॉ. नरेंद्र तेलरांधे, दिलीप ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘सोशल डिस्टन्स’चे पालन करण्यात आले.
--इन्फो--
सोशल मीडियाद्वारे प्रक्षेपण
खगोल मंडळाकडून कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेता गुरू-शनिच्या युतीचा अद्भुत नजारा, यूट्युब आणि झूम लिंकद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शेकडो खगोलप्रेमींना आनंद घेतल्याचे अभ्यासक सुजाता बाबर यांनी सांगितले. २१ डिसेंबरची रात्र ही अन्य रात्रींपेक्षा मोठी असते या रात्रीचा कालावधी सुमारे १३ तासांचा असतो. या रात्रीला अशी या दोन्ही ग्रहांची महायुती घडून येणे हे अतिदुर्मीळच असल्याचे बाबर यांनी सांगितले.