दत्ता महाले, येवला : घरा-घरांच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांनी केलेली गर्दी. कुणाची तरी पतंग कटल्यानंतर ‘गईऽऽ बोला रे धिन्ना’चा होणारा गजर, त्यातच ध्वनिक्षेपकावरून पतंग बढाव... बढाव... बढाव...असा प्रोत्साहित करणारा स्वर, सोबतीला हलकडी,बॅँडचा निनाद...अशा आनंददायी, उत्साहवर्धक वातावरणात येवल्याच्या नभांगणात पतंगोत्सव बहरला.संक्र ांत म्हटली कि येवल्यात दरवर्षी एक नवा उत्साह संचारतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे. मकरसंक्र ांत, त्याअगोदर भोगी आणि नंतरचा करीचा दिवस असे तीन दिवस येवला शहरात पतंगोत्सवाचा आनंद लुटला जातो. या तीन दिवसात शहरातील बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लागलेली असते. यंदाही शहरातील धडपड मंच,खटपट मंच,जय बजरंग फ्रेंडस सर्कल,मधली गल्ली यांच्यावतीने अत्याकर्षक पतंग उडविले जातात. १२ फडकीचे आकर्षक पतंग दिमाखाने फडकवत नववर्षासह मकरसंक्रातींच्या शुभेच्छा पतंगांच्या माध्यमातून देण्यात आल्या. आबालवृद्ध भान हरपून पतंग उडवत होते. संगीताच्या तालावर पतंगबाजीचा आनंद लुटण्यात तरुणाई मश्गुल होती.पारख अन् शर्टसोन्याचा शर्ट आणि अंगावर साडेतीन किलो सोन्याचे दागिने नेहमी परिधान करण्यामुळे जगप्रसिद्ध असणारे पंकज पारख हे येवल्यातील प्रत्येक पारंपरिक सण खास शैलीत साजरा करतात. यंदा त्यांनी खास पतंग व दोरा रेखाटलेला ५८ हजार रु पये किंमतीचा पिवळ्या रंगाचा सदरा शिवून घेतला आहे. त्यामुळे पतंगांबरोबरच पारख यांची ही खास अदाही चर्चेचा विषय ठरली.
येवल्याच्या नभांगणी बहरला पतंगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 4:34 PM
काटाकाटीचा आनंद : रंगबेरंगी आकर्षक पतंगांनी वेधले लक्ष
ठळक मुद्दे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.