नाशिक : जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात शंभर पर्सेन्टाइल गुण मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील कार्तिके गुप्ता व राज अग्रवाल यांचा समावेश आहे. या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही देदीप्यमान यश संपादन केले असून, यात अभिजित जगताप याने दिव्यांगांमध्ये देशात ५००वा क्रमांक पटकाविला असून, अनेक विद्यार्थ्यांना ९९ व त्यापेक्षा अधिक पर्सेन्टाइल मिळाले आहेत.नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यातर्फे एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत ८ लाख ८१ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत यंदापासून जेईई परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी व एप्रिल महिन्यात दोन वेळा ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना दोन्हीही वेळा ही परीक्षा देण्याची सवलत होती.पेपर क्रमांक एकमध्ये महाराष्ट्रातून अंकित कुमार मिस्त्रा याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिकमधून या परीक्षेत श्रवण नावंदर (९९.९७), जय सोनवणे (९९.८८), ईशान गुजराथी (९९.७), सिद्धी बागुल (९९.६४), श्रुती निसाळ (९९.३५), राहुल दलकरी (९९.३४), यश पाटील (९९.१७), अथर्व पगार (९८.८), शिवराज काकड (९८.८), अथर्व सरोदे (९८. ७३), तेजस चौधरी (९८.५२), दरगोडे अमेय (९८.५), शुभम पेडणेकर ( ९८.४), श्रेयश कुलकर्णी ( ९८.२१ ), सिद्धेश पगार (९८.८), सोहम चौधरी (९७.५८), मिताली सोनवणे ( ९७.३), श्रेयस कुलकर्णी (९८.१), प्रतीक जाधव (९६.५), उत्कर्ष अहिरे (९६), पूजा शेलार (९४), हित मेहता (९०), रोशन उशीर (८९) आदी विद्यार्थ्यांनी पर्सेन्टाइलसह यश संपादन केले आहे.दोनपैकी ज्या परीक्षेत गुण असतील ते पुढील प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान प्रविष्ट झालेल्या ६ लाख ८ हजार ४४० विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९७ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या परीक्षेपेक्षा गुणवारीत सुधारणा केल्याचे दिसून आले.
नाशिकच्या विद्यार्थ्यांचे जेईई मेन्स परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:02 AM