नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यातील तोंडवळ या गावात सरपंच यशोदा चौधरी यांनी आधुनिकतेची कास धरत प्रशासन/इ-प्रशासन राबविण्यास प्रारंभ केला. रत्याबद्दल त्यांना ‘इ-प्रशासन’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.पेठ तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक त्यांनी तोंडवळला मिळवून दिला. विविध प्रकारचे ३३ प्रमाणपत्रे व महसूल विभागाच्या सेवा पाड्यावरील आदिवासींना आॅनलाइन मिळवून दिल्या. यासोबतच स्पर्धा परिक्षा अर्जही आॅनलाइन उपलब्ध करुन दिले. इ-ग्राम प्रणालीमुळे कारभार पारदर्शक केला. ग्रामपंचायतीच्या कामाला गतिमानता प्राप्त करून दिली. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने ‘रोजगार निर्मिती’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पेठमधील तोंडवळच्या सरपंच यशोदा चौधरी यांनी धरली आधुनिकतेची कास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 8:15 PM