संगमेश्वर : दीडशे वर्षांपूर्वी जोतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, विधवांना आश्रय दिला, अनाथ मुलांचा सांभाळ केला, पाटाच्या पाण्यावर शेती करून दाखविली अशी अनेक समाजोद्धाराची कामे केल्यानेच ते महात्मा झाले. परंतु आजची पिढी महापुरुषांचे विचार विसरले असल्याची खंत प्रा. यशवंत गोसावी (पुणे) यांनी येथे उत्कृष्ट युवा फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त येथील महादेव मंदिर चौकात झालेल्या व्याख्यानाप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुनील गायकवाड होते. गोसावी पुढे म्हणाले, महाराष्टÑातील छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर आदींनी कधीही जातीयतेला खतपाणी घातले नाही. व्यसने केली नाहीत. आजच्या तरुणांमध्ये कोणतेही आदर्श नाहीत. त्यांना संस्काराची गरज आहे. तरच समाज प्रगतीकडे वाटचाल करू शकेल. सर्वांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रा. गोसावी यांनी यावेळी सांगितले. थोर पुरुषांच्या कार्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. पहिल्या स्त्रीशिक्षिका सावित्रीबाई फुले, जगात सर्वात बुद्धिमान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड असा मोठा वारसा आपल्याला आहे. त्या कार्याचे अनुकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक राजाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष परदेशी, अॅड. एम. जी. गिते, म. फुले उत्सव समितीचे अध्यक्ष चेतन महाजन, केवळ हिरे, संजय काळे, धर्मा भामरे, मामको बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठल बागुल, नितीन झाल्टे आदी उपस्थित होते. उत्कृष्ट युवा फाउंडेशनचे संस्थापक युवराज गिते यांनी स्वागत केले.
महापुरुषांचे विचार युवक विसरले यशवंत गोसावी : महादेव मंदिर चौकात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:12 AM
संगमेश्वर : दीडशे वर्षांपूर्वी जोतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, विधवांना आश्रय दिला.
ठळक मुद्देतरुणांमध्ये कोणतेही आदर्श नाहीत. त्यांना संस्काराची गरज सर्वांनी चिंतन करण्याची गरज