ठळक मुद्दे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता देवस्थानची पूजा त्यानंतर रथयात्रा
सिन्नर : शहरातील गावठा भागातील प्रसिद्ध देवस्थान श्री गवळीनाथ महाराज व लक्ष्मीआई यांचा रविवारी (दि. २२) यात्रोत्सव होत आहे.
शहर, तसेच राज्यातील वडार समाज बांधवांचे लक्ष्मीआई हे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी यात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच् काळात यात्रोत्सव होऊ शकला नाही. यावर्षी हा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता देवस्थानची पूजा त्यानंतर रथयात्रा होईल. संध्याकाळी शोभेची दारु उडविण्यात येईल. दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २३) कुस्त्यांची दंगल होणार आहे. भाविकांनी यात्रोत्सवास सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संजय लोणारे व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.