दत्ता महाले/येवला : राज्यात कापूस काढणी हंगाम सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात असणारे कापसाचे क्षेत्र लक्षात घेता किमान दोनशे खरेदी केंद्राची गरज आहे. परंतु मनुष्य बळाची कमतरता असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ यंदा केवळ ५० खरेदी केंद्र सुरु करणार असल्याची माहिती महासंघाच्या अध्यक्ष उषाताई शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय कापूस महामंडळाने देखील ६५ खरेदी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कापूस खरेदी केंद्राची संख्या कमी असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडणार आहे.राज्यात यंदा ४० लाख हेक्टरपर्यंत कापूस पेरणी झाली आहे. यंदा राज्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय कापूस महामंडळाने १५ आॅक्टोबर पासून राज्यात ६५ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून ५० खरेदी केंद्र सुरु करणार आहेत. या दोन्ही संस्था मिळून राज्यात ११५ कापूस खरेदी केंद्र सुरु होतील. पणन महासंघाचे राज्यात ११ झोन आहेत. त्यानुसार कापूस पट्टयात प्रत्येक दहा किलोमीटरच्या आत एक शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करणे अनिवार्य आहे. राज्यात सुमारे २०० खरेदी केंद्राची गरज आहे. परंतु पणन महासंघाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसून ग्रेडरची संख्याही अल्प आहे. हा विचार करून पणन महासंघाने यावर्षी ५० खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.कापसाच्या दरात घसरणयंदा कापसाला ६१०० रु पयापर्यंत प्रतीक्विंटल भाव मिळाला मात्र, कापसात ओलावा असल्याचे कारण देऊन प्रती क्विंटल एक हजार रु पयाने दर कमी झाले आहेत. राज्यात १५ आॅक्टोबर नंतर ५० कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. मनुष्य बळाचा अभाव असल्याने हा निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असणारे मनुष्य बळ किमान ६ महिन्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढविता येईल. १५ आॅक्टोबर दरम्यान सीसीआय खरेदी सुरु करणार असून १५ आॅक्टोबर पर्यंत पणन महासंघ खरेदी सुरु करेल.
कापूस पणन महासंघातर्फे यंदा ५० खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:07 PM
उषाताई शिंदे : मनुष्यबळाची कमतरता, २०० केंद्रांची गरज
ठळक मुद्देयंदा कापसाला ६१०० रु पयापर्यंत प्रतीक्विंटल भाव मिळाला मात्र, कापसात ओलावा असल्याचे कारण देऊन प्रती क्विंटल एक हजार रु पयाने दर कमी झाले आहेत.