घोटी : इगतपुरी तालुक्यात देवळे ते खैरगाव, शेनवड बु. या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्ता दर्जोन्नती कामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले होते. दीड वर्ष उलटूनही अद्यापही या मार्गाच्या रस्त्याचे काम अपूर्णच आहे. याबाबत सातत्याने बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही यंत्रणेनेही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.इगतपुरी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात देवळे-खैरगाव-शेनवड बु. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून दळणवळणाचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या साडेचार किलोमीटरच्या कामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले. मार्च १९ मध्ये या रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामाला सुरुवात झाली. काम सुरू करण्याचा देखावा केला. प्रत्यक्षात अद्यापही हे काम अपूर्ण स्थितीतच आहे. हे काम दोन वर्षे उलटत येऊनही पूर्ण का होऊ शकले नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने लहानमोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. याबाबत अनेकवेळा संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनात येत आहे.या रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरूकरण्यात यावे. कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नाशिक व प्रशासन अधिकारी, तसेच संबंधित बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून तत्काळ काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही भाजपाचे ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिल परदेशी यांनी केली.
काम सुरू होऊन दीड वर्ष उलटूनही काम अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:14 PM
घोटी : इगतपुरी तालुक्यात देवळे ते खैरगाव, शेनवड बु. या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्ता दर्जोन्नती कामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले होते. दीड वर्ष उलटूनही अद्यापही या मार्गाच्या रस्त्याचे काम अपूर्णच आहे. याबाबत सातत्याने बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही यंत्रणेनेही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देयंत्रणेचीही डोळेझाक : इगतपुरी तालुक्यातील देवळे - खैरगाव रस्ता अद्यापही अपूर्णच