शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या दहा टक्के जादा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:28 AM

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील आजवरचे विक्रम मोडीत काढले असून, गतवर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बागलाण तालुक्यात अडीचशे, तर नाशिक तालुक्यातही दोनशे टक्क्याहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील आजवरचे विक्रम मोडीत काढले असून, गतवर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बागलाण तालुक्यात अडीचशे, तर नाशिक तालुक्यातही दोनशे टक्क्याहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे. बारा तालुक्यांमध्ये सरासरी दीडशे टक्के, तर कळवण, देवळा, नांदगाव या तीन तालुक्यांमध्ये ७० टक्केच पाऊस झाला आहे.शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने झडी लावली असून, गेल्या पाच दिवसांमध्ये सूर्यदर्शन होऊ शकले नाही. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या खालोखाल नाशिक शहर व परिसराला पावसाने झोडपून काढतानाच दिंडोरी, चांदवड, कळवण, बागलाण, निफाड, सिन्नर या तालुक्यांनाही जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. भात सोडून अन्य पिकांच्या पेरण्या जवळ जवळ पूर्ण झाल्या असून, भाताची आवणी जोरातसुरू झाली आहे. त्यासाठी सध्याचापाऊस सर्वाधिक उपयोगी असल्याने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी तालुक्यात भरपावसात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे.  जिल्ह्णात जुलै महिन्यात आजवर ५६७१ मिलिमीटर पावसाची सरासरी राहिली आहे. यंदा मात्र ८३८६ मिलिमीटर पाऊस जुलैच्या अखेरच्या दिवसापर्यंत नोंदविला गेला आहे. त्यातही जिल्ह्णाच्या वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस जुलै महिन्यातच पडून गेला आहे. गेल्या वर्षी ३० जुलै रोजी जिल्ह्णात ५५ टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊन दुष्काळी परिस्थितीची चाहूल लागली होती.पावसाच्या सातत्याने जिल्ह्णातील नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले असून, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. जवळपास सात धरणांनी धोक्याची पातळी गाठल्याने त्यातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. परिणामी गोदावरी, कादवा, दारणा यांसारख्या नद्यांना पूर आला असून, काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.जुलै महिन्यातील एकूण पाऊस (कंसात गेल्या वर्षाचा पाऊस)नाशिक - ४७५.९ (४२९.३)इगतपुरी- २०५६.० (२१६८.०)दिंडोरी - ४४६.० (२६५.०)पेठ - ११५०.३ (१५५२.७)त्र्यंबक - १५५३.० (१०८१.०)मालेगाव- २३१.० (१७५.०)नांदगाव - ७९.० (११०.०)चांदवड- १७२.० (२०९.०)कळवण - १६५.० (२४९.०)बागलाण - २४८.० (१९०.०)सुरगाणा - ९८५.१ (१२८१.०)देवळा- १४५.६ (१७७.०)निफाड- २२८.८ (७६.६)सिन्नर- २७१.० (२३६.९)येवला - १८०.२ (२४७.६)

टॅग्स :floodपूरRainपाऊसgodavariगोदावरीgangapur damगंगापूर धरण