नाशिक: जिल्'ातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. जिल्'ातील सुमारे पावणेदोन लाख कार्डधारकांना आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात साखर वाटप केली जाणार आहे. या योजनेतील कार्डधारकांसाठी जिल्'ाला सुमारे ४६२३ क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.कोरोनाच्या संकट काळात पुरवठा विभागाकडून कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्डावरील नियमित धान्य आणि गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्यांचा लाभ देखील जिल्'ातील कार्डधारकांना झालेला आहे. आता अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साखरेचेही वाटप केले जाणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्'ातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन मंजूर केले आहे.बीपीएल अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे साखर वाटप केली जाणार आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांसाठी जिल्'ातल ४६२३ क्विंटल इतकी साखर प्राप्त झाली आहे. या साखरेची उचल करून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून वितरण केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या साखरेची उचल करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.बागलाण ३९०, चांदवड १९९, दिंडोरी ३१९, देवळा १४७, धान्य वितरण अधिकारी नाशिक २५४, धान्य वितरण अधिकरी मालेगाव ३८८, इगतपुरी २५०, कळवण २१५, मालेगाव ३५०, नाशिक २४६, निफाड २२०.५० क्विंटल, नांदगाव १००, मनमाड ८६, पेठ ३०५, सिन्नर २३६, सुरगाणा ३९२.५०, त्र्यंबकेश्वर २२५, येवला ३०० क्विंटल याप्रमाणे जिल्'ासाठी एकुण ४६२३ क्विटल साखरेचे नियतन मंजूर झालेले आहे.अंत्योदय कार्डधारकांना तीन महिन्यांसाठीचे साखरेचे वाटप केले जाणार आहे. तालुकानिहाय मंजूर साखरेची उचल करून स्वस्त धान्य दुकानांमध्ये साखर पोहच केली जाणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांमध्ये जाऊन साखरेची मागणी करावी- अरविंंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.