शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:59 PM

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम यंदाच्या दीपोत्सवात बघायला मिळाला असून, यंदाच्या दिवाळीत आवाजाचे आणि रोषणाईचे फटाके फुटण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे दिसून आले.

नाशिक : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम यंदाच्या दीपोत्सवात बघायला मिळाला असून, यंदाच्या दिवाळीत आवाजाचे आणि रोषणाईचे फटाके फुटण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे दिसून आले.  दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘नॉइज मीटर’च्या सहाय्याने शहरात ठिकठिकाणी ध्वनी पातळी मोजण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. दिवाळीच्या तीन दिवसांऐवजी केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच नागरिकांनी फटाके फोडल्याने इतर दिवशी त्या तुलनेत प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. यावर्षी शासन आदेश, पोलीस , प्रशासन आणि फटाके विक्रेत्यांमधील घोळामुळे स्टॉल उभारण्याची प्रक्रिया वसुबारसपर्यंत लांबल्याने याचादेखील परिणाम फटाके विक्रीवर झाला होता.  शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची देण्यात आलेली सामूहिक शपथ आणि माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने करण्यात येणारी जनजागृती या पार्श्वभूमीवरदेखील नाशिककरांनी फटाके खरेदीसाठी विशेष उत्साह दाखवला नाही. अनेक नागरिकांनी केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडण्यासाठी फटाके घेतले तर अनेकांनी फटाक्यांची माळ, बॉम्ब, रॉकेट न घेता केवळ भुईचक्र, झाड असे केवळ रोषणाईचेच फटाके घेतल्याने फटाके खरेदीचा खर्च दरवर्षीच्या तुलनेत कमी झाला.