नाशिक : शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली. विशेषत: जाचक नियमावली आल्यानंतर त्यावर निर्बंध आले आणि मंडळांची संख्या कमी होत गेली. डिजे, त्यानंतर वेळेची मर्यादा त्याचे उल्लंघन केल्यानेदेखील मंडळांचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. नोकरी, व्यवसाय सांभाळून हौसेने आणि सामाजिक बांधीलकीतून परिसरातील युवक आणि अन्य नागरिक मंडळ स्थापन करत असतात. परंतु त्यांना भलत्याच संकटांना सामोरे जावे लागत असल्याने कार्यकर्त्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली. तशी मंडळांची संख्या कमी होत गेली. गेल्या दोन वर्षांपासून मंडळांना अधिक नियमांचे पालन करावे लागत असून, जरा चूक झाली की थेट कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बहुतांशी मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे.महापालिकेत ५६४ मंडळांनी अर्ज केला होता. त्यातील ५४४ मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली असून, वीस मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्यावर्षी महापालिकेने ६३७ मंडळांनी अर्ज केले होते. यंदा ५६४ मंडळांनीच अर्ज केल्याने ९३ मंडळांनी पाठ फिरवली आहे. यासंदर्भात अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असताना त्यांनी महापालिकेच्या जाचक नियमावलीचा संदर्भ दिला आहे. जाचक अटी आणि अन्य गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यांमुळे यंदा उत्सवच नको अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. उलट मंडळांनी या जाचक अटींना सामोरे जाण्यापेक्षा जमवलेल्या निधीतून पूरग्रस्तांनाच मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.जाचक नियमांमुळे मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे. महापालिकेने यंदा आॅनलाइन मंडप मंजुरी आठ दिवस अगोदरच बंद केली. त्यामुळे गोंधळ झाला. अनेक मंडळे वर्गणी जमल्यानंतर ऐनवेळी मंडपासाठी परवानगी घेतात. परंतु त्यांची त्यामुळे अडचण झाली. नाशिकरोड येथे यंदा मंडळांची संख्या कमी झाली असून, जास्तीत जास्त सात ते आठ मोठी मंडळेच शिल्लक आहेत.- समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळगणेशोत्सव म्हटला की सार्वजनिक मंडळांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. मात्र यंदा नाशिक शहरात महपालिकेने मंडप नियमांची काटेकोर केलेली अंमलबजावणी आणि त्यातच पश्चिम महाराष्टÑात आलेला महापूर याचे निमित्त करून शहरातील ९३ मंडळांनी यंदा उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मंडप नियमावलीचा भंग केल्याने त्यासंदर्भात न्यायालयात मंडळाची नावे गेल्याने कार्यकर्ते धास्तावले आहेत.
यंदा ९३ मंडळांची गणेशोत्सवाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:56 AM