नाशिक : महापालिकेने घरपट्टीत १८ टक्के दरवाढ करत नाशिककरांच्या खिशात हात घातला असतानाच पाणीपट्टीतील दरवाढ मात्र यावर्षी टळल्याने दिलासा लाभला आहे. नियमानुसार, दरवाढीचा प्रस्ताव २० फेब्रुवारीच्या आत महासभेकडून मंजूर होणे बंधनकारक आहे. परंतु, नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणीदरवाढीचा प्रस्ताव यापुढे करविभागाऐवजी पाणीपुरवठा विभागामार्फत मागविण्याचे ठरविल्याने आणि नियमानुसार दरवाढीचा प्रस्तावच महासभेवर नसल्याने यावर्षी पाणीदरवाढीचे गंडांतर टळले आहे. मात्र, पुढील वर्षी १ एप्रिल २०१९ पासून पाणीपट्टीत जबर दरवाढीचे संकेत मिळत आहेत. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्थायीच्या प्रस्तावात सुधारणा करत घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली होती. महासभेने भाडेमूल्यावर आधारित सदर दरवाढीला हिरवा कंदील दाखविल्याने त्याचे पडसाद नाशिककरांमध्ये उमटले होते. भाजपा विरोधकांनी मोर्चे, आंदोलने, धरणे या माध्यमातून आपला विरोध प्रगट केला होता. जनमताचा रेटा पाहून अखेर सत्ताधारी भाजपाने नमते घेत घरपट्टी दरवाढ सरसकट १८ टक्क्यांवर आणून ठेवत विरोध शमविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मागील महिन्याच्या महासभेत घरपट्टीबरोबरच पाणीपट्टी दरवाढीचाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता. परंतु, आयुक्तांनी सदरचा प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिल्याने करविभागाकडून तो मागे घेण्यात आला होता. त्यामुळे घरपट्टीबरोबरच पाणीपट्टी दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
यावर्षी दिलासा : मात्र पुढील वर्षापासून जबर दरवाढीचे संकेत पाण्याची दरवाढ टळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:24 AM
नाशिक : महापालिकेने घरपट्टीत १८ टक्के दरवाढ करत नाशिककरांच्या खिशात हात घातला असतानाच पाणीपट्टीतील दरवाढ मात्र यावर्षी टळल्याने दिलासा लाभला आहे.
ठळक मुद्देयावर्षी पाणीदरवाढीचे गंडांतर टळले घरपट्टी दरवाढ सरसकट १८ टक्क्यांवर