निफाड : येथे ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट.. जय मल्हार’च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. निफाड नगरपंचायत व खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीच्या वतीने माघ पौर्णिमेनिमित्त खंडोबा महाराज यात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.सकाळी देवीदास अहेर, अण्णा शेलार, रोहित दुसाने यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराजांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर कादवाकाठी खंडोबा महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात येऊन कावडीतून आणलेल्या गंगाजलाची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भंडारा उधळण्यात आला. मिरवणुकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने नृत्य करून लक्ष वेधून घेतले. यानंतर गंगाजलाने खंडेराव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.दुपारी देवाचे मानकरी कचेश्वर दुसाने यांच्या निवासस्थानापासून देव मंदिरात आल्यानंतर रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचे रथाचे मानकरी ब्रिजलाल भुतडा होते. सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने व खंडेराव महाराज की जयच्या जय जयकाराने शिवाजी चौकात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. पिवळ्या रंगाने रंगविण्यात आलेल्या गाड्या मंदिराचे भगत रमेश शेलार यांनी ओढल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, उपनगराध्यक्ष मंगल वाघ याच्यासह नगरसेवक व मुख्य अधिकारी किशोर चव्हाण उपस्थित होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यात्रोत्सवानिमित्त रविवारी (दि. ४) सकाळी ९वा. नाशिक सायकलिस्ट व पावा ग्रुप यांच्या वतीने नाशिक ते निफाड सायकल रॅली काढण्यात येणार आहे.वेदिका वेल्फेअर फाउण्डेशन नाशिक, पावा ग्रुप नाशिक व निफाड डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोरायसिस आरोग्य तपासणी व ग्रामसंस्कार केंद्रात सकाळी १० वा. महिलांसाठी रांगोळी व पाककला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष मुकुंद होळकर, उपनगराध्यक्ष मंगल वाघ, मुख्य अधिकारी किशोर चव्हाण, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भगवान गाजरे, उपाध्यक्ष संजय कुंदे, खजिनदार जानकिराम धारराव, सुभाष कर्डिले, नामदेव जाधव, साहेबराव कापसे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे.चांदवड येथे यात्रोत्सवचांदवड : येळकोट, येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराजकी जयच्या जयघोषात चांदवड येथील राजमंदिर खंडोबा देवस्थानच्या वतीने माघी पौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सव संपन्न झाला. घटस्थापना मार्तंड देवस्थान ट्रस्टचे संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. आठवडे बाजारातील हनुमान मंदिरापासून निघालेल्या कावडी रथाचे मानकरी दत्ताभाऊ बाजीराव कोतवाल होते, तर कावडी व गंगाजल सिद्धेश्वर मित्रमंडळ, कोतवाल वस्ती यांनी केली.सायंकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संजय बाबूराव गवळी यांच्या हस्ते झाला. तर मिश्रीलाल तनसुखलाल अग्रवाल यांच्या वतीने महाप्रसाद झाला. रात्री पुजारी निवृत्ती अण्णा जेऊघाले, पप्पूभाऊ आहेरराव, रायपूर व सर्व रायपूर बेट यांचा लंगरी जागरणाचा कार्यक्रम झाला. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी अनिल कोतवाल, उपाध्यक्ष आदित्य फलके, आदेश शेळके, विशाल गवळी, गणेश गवळी, अरुण शिंदे, श्यामभाऊ सोनवणे, सुनील कोतवाल व खंडेराव महाराज यात्रा पंचकमिटीने केले.
येळकोट येळकोट जय मल्हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:56 AM
निफाड : येथे ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट.. जय मल्हार’च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. निफाड नगरपंचायत व खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीच्या वतीने माघ पौर्णिमेनिमित्त खंडोबा महाराज यात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्देनिफाड : खंडेराव महाराज यात्रेत कावडीची मिरवणूक