शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

येळकोट येळकोट जय मल्हार ;  ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:58 PM

येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय असा जयघोष देत वातावरण दुमदुमले. आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडाºयाची उधळण करत, खंडेराव महाराजांचा जयघोष व गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला.  बारागाड्यांना देवाचा हा वारू जोडून गोरज मुहूर्तावर बारागाड्या ओढून खºया अर्थाने ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली. ही ईश्वरी अनुभूती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृद्ध भाविक गर्दीत भंडाºयाची  उधळण व सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार अशा मल्हाराच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला.

ओझर : येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय असा जयघोष देत वातावरण दुमदुमले. आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडाºयाची उधळण करत, खंडेराव महाराजांचा जयघोष व गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला.  बारागाड्यांना देवाचा हा वारू जोडून गोरज मुहूर्तावर बारागाड्या ओढून खºया अर्थाने ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली. ही ईश्वरी अनुभूती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृद्ध भाविक गर्दीत भंडाºयाची  उधळण व सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार अशा मल्हाराच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला. नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराव महाराज मंदिर.  जेजूरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझरची यात्रा, अशी ओळख पूर्वीपासून लाभलेली आहे. यानिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक यामध्ये सहभागी होतात.  सत्त्वाचा मल्हारी म्हणून पंचक्रोशीत त्याची ओळख आहे. या खंडेरायाची यात्रा तब्बल पाच दिवस भरते. शुक्रवारी यात्रेला प्रारंभ झाला असून, या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेचे द्वादश मल्हाररथ ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वत:हून येत असल्याची आख्यायिका आहे. ही ईश्वरी अनुभूती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखो आबालवृद्ध भाविकांनी गर्दी केली. भंडाºयाची उधळण व सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार अशा मल्हाराच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी मंदिराच्या आवारात हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. यात तमाशातील कलावंत खंडेरायाची गाणी म्हणतात. त्या बदल्यात ग्रामस्थ त्यांना बक्षिसी देतात. हजेरीनंतर कुस्त्यांची दंगल होते. यंदा भव्य स्वरूपात कुस्त्यांचे आयोजन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी परंपरेनुसार संध्यासमयी देवांना पुन्हा पालखीत बसवून वाजत-गाजत आपापल्या स्थानी, मानकºयांच्या गृही विराजमान करण्यात येणार आहे.  ग्रामपालिका प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. पोलिसांची विशेष कुमक तैनात केली आहे. त्यात शंभरहून अधिक पोलीस यात्रेसाठी दाखल झाले आहेत. डीजेला फाटा देत यंदा संबळ, बेंजो ढोल ताशांच्या तालावर तरुणाई थिरकली. पगार गवळी पंच मंडळाने परिधान केलेले भगवे फेटे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. मंदिरासमोर एकेरी मार्ग असल्याने पुढील तीनचार दिवस वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी केले आहे.  देवाची पहिली पालखी गावातून काढली. देवदासींचे नृत्य, गोंधळ्यांची गीते, रणशिंगांचा नाद, सोबत येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. यात्रेच्या पहिल्या दिवशी आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडारा उधळला गेला. ओझरचे सगळे रस्ते पिवळेमय झाले. बाणगंगेतून दर्शन करून अश्व पुढे गेला. पावलोपावली खंडेराव महाराजांचा जयघोष झाला व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला गेला.  कै. विष्णुपंत पगार यांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, मधला माळीवाडा, सिन्नरकर-निंबाळकर-चौधरी, समस्त पगार, गवळी, रास्कर, भडके, वरचा माळीवाडा, भडके कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांची बैलगाडी, त्यात वाघ्यामुरळी अशा बारागाड्यांना देवाचा हा वारू जोडून गोरज मुहूर्तावर या बारागाड्या ओढून खºया अर्थाने यात्रेला सुरुवात झाली.