शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पिवळ्या पट्ट्याची ‘लक्ष्मणरेखा’ : एम.जी.रोडवरील वाहनउचलेगिरीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 9:16 PM

नाशिक : शहरातील बाजारपेठ व अत्यंत वर्दळीचा प्रमुख मात्र अरुंद असलेला एम.जी.रोड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. एम.जी. रोडवर अनेकदा वाहन उचलण्यावरून नागरिक व पोलिसांमध्ये खटके उडतात. या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी पिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून देत वाहन पार्किंगला मुभा दिली आहे.सम-विषम तारखेनुसार पी१, पी२ पार्किंगची सुविधा एम.जी.रोडवर देण्यात आली होती; ...

ठळक मुद्देपिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून देत वाहन पार्किंगला मुभा अन्यथा ‘नो पार्किंग’च्या टोर्इंग कारवाईला सामोरे जावे लागेल

नाशिक : शहरातील बाजारपेठ व अत्यंत वर्दळीचा प्रमुख मात्र अरुंद असलेला एम.जी.रोड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. एम.जी. रोडवर अनेकदा वाहन उचलण्यावरून नागरिक व पोलिसांमध्ये खटके उडतात. या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी पिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून देत वाहन पार्किंगला मुभा दिली आहे.सम-विषम तारखेनुसार पी१, पी२ पार्किंगची सुविधा एम.जी.रोडवर देण्यात आली होती; मात्र या नियमांचे पालन नागरिकांकडून होत नसल्याने अनेकदा वाहने टोर्इंग करून पोलिसांकडून नेली जात होती. एकू णच एमजी रोडवरील वाहतूक व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलीस प्रशासनाविरुध्द नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. महापालिकेकडून वाहनतळाची अधिकृत व्यवस्था नागरिकांसाठी या भागात करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनतळाची सुविधा न पुरविता नागरिकांवर रस्त्यालगत वाहने उभी केली म्हणून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम अन्यायकारक असल्याचे बोलले जात होते. एम.जी.रोडवर सातत्याने वाहतूक पोलीस, टोर्इंग कर्मचारी व नागरिकांमध्ये वादविवादाच्या घटना घडत होत्या. यामुळे पोलीस दलाचे नावलौकिकाला तडा जात होता. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे तक्रारींचा ओघ सातत्याने सुरू होता. अखेर पोलीस प्रशासनाने या समस्येवर ‘पिवळी लक्ष्मणरेखा’ आखण्याचा उपाय केला. पिवळ्या पट्ट्याच्या आत नागरिक आपली हलकी वाहने उभी करू शकतात, अशी नवी अधिसूचना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.७) जाहीर केली. रस्त्याच्या दुतर्फा पिवळा पट्टा मारण्यात येणार असून या पट्ट्यामध्ये नागरिकांनी वाहने उभी करावी, अन्यथा ‘नो पार्किंग’च्या टोर्इंग कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पाटील यांनी अधिसूचनेत म्हटले आहे. या भागातील व्यावसायिक वर्गाकडे मालाची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या अवजड वाहनांना मात्र पिवळ्या पट्ट्यात उभे करण्यास अधिसूचनेत मज्जाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची अवजड वाहने एमजीरोडच्या दुतर्फा उभी राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय