शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

येवला नगर परिषद अभूतपूर्व गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:01 AM

पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही आणि सध्याचे मुख्याधिकारी कामकाजासाठी वेळ देत नाहीत. ठरलेला वार असलेल्या दिवशी नगरपालिकेत हजर राहत नाहीत. सांगितलेली कामे होत नाहीत, याचे उत्तर नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवकांच्या गटाने केली. परंतु समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये अपक्षांच्या गटाने अभूतपूर्व गोंधळ घालत सभा तहकूब केली.

येवला : पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही आणि सध्याचे मुख्याधिकारी कामकाजासाठी वेळ देत नाहीत. ठरलेला वार असलेल्या दिवशी नगरपालिकेत हजर राहत नाहीत. सांगितलेली कामे होत नाहीत, याचे उत्तर नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवकांच्या गटाने केली. परंतु समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये अपक्षांच्या गटाने अभूतपूर्व गोंधळ घालत सभा तहकूब केली.दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवक शीतल शिंदे आणि सचिन शिंदे यांनी जनतेची कामे नगरपालिकेत सांगूनही कोणतीही हालचाल होत नसल्याचा निषेध म्हणून सर्वसाधारण सभेत अध्यक्षांच्या समोरच सभागृहात ठिय्या मांडत जाब विचारला आणि सभेवर बहिष्कार टाकीत भर सभेतून बाहेर जात प्रवेशद्वारावर ठिय्या देत घोषणाबाजी केली. त्यामुळे गणसंख्या पर्याप्त नसल्याने सभेचे कामकाज नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी तहकूब केले व पुन्हा सभा दुपारी बोलविली. मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांनी नियमाचा आधार घेत, तहकूब सभेला कोरमची आवश्यकता नसल्याने राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेच्या तीन नगरसेवकांच्या अनुपस्थितीत सभेचे कामकाजास सुरुवात केली. नगर परिषदेची सभा गुरुवारी बोलाविण्यात आली होती. सभेला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपाध्यक्ष सूरज पटणी यांच्यासह एकूण २६ सदस्य हजर होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. संकेत शिंदे व अजय भागचंद जैन हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने गैरहजर होते. वंदे मातरम झाल्यानंतर रेल्वे अपघात, सीमेवर शहीद झालेले जवान, बाभुळगाव शिवारात झालेला अपघात, शहरातील ज्ञात-अज्ञात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अपेक्षेप्रमाणे सभेला गोंधळातच सुरु वात झाली नगरसेवक प्रा.शीतल प्रशांत शिंदे यांनी नगराध्यक्षांसमोर जमिनीवर बसून ठाण मांडले. प्रभागातील कामे का केली जात नाही असा जाब विचारला आणि जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत सभागृहात खुर्चीवर बसणार नाही, असे अध्यक्षांना सुनावले. शीतल शिंदे यांच्या साथीला राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन शिंदे, प्रवीण बनकर, शेख परवीनबानो, शेख तेहसीन, मोमीन सबिया, शेख रईसाबानो मुश्ताक हेदेखील येत नगराध्यक्षांसमोर येऊन जमिनीवरच ठाण मांडून बसले व विकासकामे त्वरित सुरू करावीत, अशी जोरदार मागणी केली. कोणतीही कामे सांगितले तर नगरपालिकेचे कर्मचारी निधी नाही असे उत्तर देत कामे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना सांगा असे सांगतात, असा आरोप करीत प्रा.शीतल शिंदे यांनी नऊ महिने झाले तरी कवडीचेही काम नगरपालिका करीत नाही तर मग आमच्या कॉलनी भागातून गोळा होणारा मोठा महसूल जातो कुठे, असा सवाल केला. दरम्यान मुस्लीम भागात कामे होत नसल्याबददल शेख अमजद,सफीक शेख, व सर्व मुस्लीम नगरसेवकांनी नगराध्यक्षांना विचारणा केली. देविचा खुंट ते नागड दरवाजा व न्यायालयाकडे जाणार्या रस्त्यावर एलईडी बल्ब असलेली स्ट्रिटलाईट लावण्याची मागणी करीत विकासकामाच्या बाबतीत भेदभाव केला जात असल्याचा आरोप मुस्लिम नगरसेवकांनी केला. यावर नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर यांनी सर्व नगरसेवकांची कामे मार्गी लावली जातील व सभेचे कामकाज सुरु करावे. आपल्या आसनावर बसावे अशी विनंती केली. परंतु समाधान न झाल्याने शेख अमजद,शफीक शेख.शेख निसार अहमद, शेख परवीनबानो, शेख तेहसिन, मोमीन सबिया,शेख रईसाबानो मुश्ताक यांनी सभात्याग केला. अपक्षाचे गटनेते नगरसेवक रु पेश लोणारी यांनी मुख्याधिकारी हे दर बुधवार व गुरु वार येणार असे कबुल करु न देखील बुधवार 30 आॅगस्ट रोजी न आल्याने त्यांनी स्पष्टीकरण दयावे व माफी मागावी बाबत मागणी केली परंतु मुख्याधिकारी यांनी स्पष्टीकरण देतांना या आठवडयातील सोमवार रोजी येवला नगरपरिषदेचे भुयारी गटार संदर्भात मा.उच्च न्यायालय,मुंबई येथे हजर राहुन काम पाहिले व मंगळवार व बुधवारी सकाळचे सत्रात मनमाड नगरपरिषदेमध्ये कामकाज केले व दुपारचे सत्रात धार्मिक कामानिमित्त सुटटी घ्यावी लागली असे सभागृहास सांगितले तथापि मुख्याधिकारी यांनी या प्रश्नावर समाधानकारक उत्तरे न देता नगरसेवकांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करीत अपक्ष नगरसेवक रु पेश लोणारी यांचेसह अपक्ष नगरसेविका पद्मा शिंदे,सचिन मोरे, शिफक शेख, अमजद शेख यांचेसह शिवसेनेच्या दयानंद जावळे आण ि यांनी सभात्याग केला.