नांदगाव: येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागाच्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या नेटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या.तर साखळी सामन्यात लोकनेते हिरे महाविद्यालय पंचवटी (नाशिक) विरूध्द महात्मा गांधी विद्यामंदिरचे कला,वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्यात झाला .येवला महाविद्यालयाने हा सामना जिंकला दुसर्Þया सामन्यात कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालय,नांदगाव विरूध्द एस.व्ही.के.टी महाविद्यालय देवलाली कँम्प या सामन्यात नांदगाव महाविद्यालयाचा पराभव करून देवलाली कँम्प महाविद्यालय जिंकले. उदघाटन नांदगावचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले. मनमाड नगरपालिकेचे नगरसेवक कैलास पाटील, सर्जेराव पाटील, मीनाक्षी गवळी,प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल,अनंत आहेर ,शाकिर शेख, विलास लोखंडे,एस.एस.कवडे, आर.टीदेवरे यांच्या उपस्थितीत नाशिक विभाग मुलींच्या नेटबॉल सामन्यांचे उदघाटन करण्यात आले. .रोशनी गुजराथी, एस.आर.नांदुर्डीकर, सोपान जाधव हे संघ व्यवस्थापक उपस्थित होते. स्पर्धांचे आयोजन शारिरीक शिक्षण संचालक दिनेश उकिर्डे व कडलग यांनी केले उपप्राचार्य संजय मराठे यांनी आभार मानले .
येवला महाविद्यालयाच्या खेळाडूंची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 4:48 PM
नांदगाव: येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागाच्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या नेटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या.
ठळक मुद्दे या स्पर्धेत देवळाली कँम्प एस.व्ही.के.टी महाविद्यालय विरु द्ध येवला महाविद्यालय यांच्यात अंतिम सामना रंगला. सामन्यात १९-२० एकच्या फरकाने येवला महाविद्यालयाने एस.व्ही.के.टी महाविद्यालयाचा पराभव केला.