येवला : तालुक्यातील पीकविमा नुकसानीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन विमा कंपनीच्या संबंधित अधिकाºयाला देण्यात आले आहे. कार्यवाही न झाल्यास विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.येवला तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात सन २०१७ - १८ सालातील पीकविम्याचे दावे मंजूर होऊनही विमा कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून, शेतकºयांना भांडवलाची अत्यंत गरज आहे; मात्र विमा कंपनीने अद्यापही नुकसानभरपाई न दिल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.कंपनीकडून शेतकºयांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपासले आहे.याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंतराव झांबरे, तालुका सरचिटणीस रामभाऊ नाईकवाडे, किरण चरमळ, सागर गायकवाड, योगेश चव्हाणके, भागवत भड, बाळासाहेब बोराडे, नारायण घोटेकर, संदीप कोकाटे, ज्ञानेश्वर वाघ, किरण गायकवाड, मारु ती मापारी, रवि कदम आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.भरपाई देण्यास टाळाटाळयेवला तालुक्यात हजारो शेतकरी दरवर्षी न चुकता पीकविम्याचा हप्ता संबंधित कंपनीकडे अदा करतात. मात्र, आजपर्यंत एकाही शेतकºयाला नुकसानभरपाई मिळाल्याचे ऐकिवात नाही. गतवर्षी पडलेल्या भयानक दुष्काळाने शेतकरी होरपळलेला असताना विमा कंपनीने या शेतकºयांना आधार देण्याची गरज असताना संबंधित विमा कंपनी मात्र आर्थिक भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे.
येवला : तालुक्यातील शेतकरी अडचणीत‘प्रहार’चे विमा कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 9:49 PM
येवला : तालुक्यातील पीकविमा नुकसानीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन विमा कंपनीच्या संबंधित अधिकाºयाला देण्यात आले आहे. कार्यवाही न झाल्यास विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
ठळक मुद्देविमा कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.