नेऊरगाव येथील पुष्पाबाई कदम मोठा मुलगा गुलाब कदम २७ डिसेंबर २००१ मध्ये जम्मू-काश्मीर येथे शहीद झाले, याचे दुःख वीरमातेच्या मनाशी कायम असतानाच पतीचे वृद्धापकाळाने निधन झाले. पतीच्या नावावर येत असलेली पेन्शन बंद झाल्याने लहान सूनबाई मोलमजुरी करून सांभाळ करत होती. या मातेच्या वेदना येवला तालुका सैनिक ग्रुपने जाणून घेत सामाजिक बांधीलकी जोपासत १ लाख ३५ हजाराचा जमा निधी एस.बी.आय शाखेत वीरमातेच्या नावे अकाैंट खोलत बँक मॅनेजर जयेश यांच्या उपस्थितीत जमा केले तसेच वीरमातेची पेन्शन तत्काळ सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
यावेळी येवला तालुका सैनिक ग्रुप प्रमुख सुशील शिंदे, येवला तालुका सैनिक ग्रुप उपप्रमुख सुरेश धनवटे , सुभेदार अरुण कोकाटे , जळगाव नेऊर गट अध्यक्ष आनंद गुंड, सायगाव गट अध्यक्ष विजय चव्हाण , भारम गट अध्यक्ष दिलीप शिंदे, मुखेड गट अध्यक्ष आदमने, मुखेड गट उपाध्यक्ष सचिन वाघ, मेजर माने सर, एस.बी.आय. बँक मॅनेजर जयेश, आजी-माजी सैनिक, उपस्थित होते.
कोट...
वीरमाता, वीरपत्नी, सैनिक परिवार यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्या अडचणी सैनिक ग्रुप सोडविण्यासाठी तत्पर आहे. ‘जय जवान, जय किसान’ ह्या उक्तीप्रमाणे सैनिक सीमेवर लढतो पण सैनिकांना साथ देणारा हा शेतकरी आहे म्हणून सैनिक ग्रुप मदत करत राहील.
- सुशील शिंदे, येवला तालुका सैनिक ग्रुप अध्यक्ष
फोटो- १३ जळगावनेऊर१
नेऊरगाव येथील वीरमाता पुष्पाबाई कदम यांना मदतप्रसंगी उपस्थित सैनिक ग्रुप अध्यक्ष सुशील शिंदे,सुनील धनवटे,सुभेदार अरुण कोकाटे.
130821\13nsk_29_13082021_13.jpg
नेऊरगाव येथील वीरमाता पुष्पाबाई कदम यांना मदतप्रसंगी उपस्थित सैनिक ग्रुप अध्यक्ष सुशिल शिंदे,सुनील धनवटे,सुभेदार अरुण कोकाटे.