येवला : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शहरातील ७२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोना बळींची संख्या तीन झाली आहे. शहरातील ६२ वर्षीय वृद्धाबरोबरच ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल गुरुवारी, पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. यापैकी ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या आठ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील सहा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात, तर २ बाभुळगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. बाभुळगाव येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात १५ संशयित रुग्ण दाखल असून, ७० व्यक्तींना होम क्वॉरण्टाइन राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी दिली.
--------------------अंदरसूल तीन दिवस बंदअंदरसूल लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात गावात कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी ११ जून ते १३ जूनपर्यंत गाव बंदचा निर्णय घेतला आहे. भाजीपाला बाजारदेखील तीन दिवस बंद ठेवला आहे.