येवला : शहरातून जाणारा मनमाड - नगर राज्य महामार्गावर दिवसातून अनेकदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनली आहे.नगर - मनमाड आणि नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे.येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरु ज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील विंचूर चौफुली व फत्तेबुरु ज नाका येथे सकाळी दहा वाजल्यापासून ट्रॅॅफिक जाम सुरु झाला. याच मार्गाने एक वरिष्ठ अधिकारी जात होते. ते देखील या ट्रॅॅफिक जामच्या विळख्यात सापडले. मात्र यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने १५ ते २० मिनिटे थांबून वाहतूक सुरळीत केली. मात्र त्या साहेबांची गाडी गेल्यानंतर अवघ्या दोन तीन मिनिटात पुन्हा ट्रॅफिक जॅम झाली. रस्त्याच्या दोनही बाजूंनी दोन ते तीन किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. याकरिता पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन येथे कर्मचारी नियुक्ती करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या.नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने येवला विंचूर चौफुलीवरील वाहतुकीच्या कोंडीत सापडत आहेत. त्यातच शहरात लावलेल्या अभिनंदनाच्या फलकांचा अडथळा होत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. प्रवाशी आणि माल वाहतूक करणाºया गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.शहरातील तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर अनेकदा वाहनचालकांना खाली उतरून वाहतुकीचे नियमन करावे लागते. वास्तविक पाहता येवला-विंचूर चौफुलीवर वाहतूक सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभे राहू शकत नाही. या साºया वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वळण मार्गावर सिग्नल नसल्याने नाराजीयेवला विंचूर चौफुलीसह पारेगाव रस्त्याच्या वळण मार्गावर वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक दिवसांची मागणी आहे. या मार्गावरून महाविद्यालयाकडे जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या रस्त्यावर झेब्रा क्र ॉसिंग सह सिग्नल बसवावेत अशी मागणी अनेकदा करण्यात आली, तरीदेखील दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
येवला-विंचूर चौफुलीवर वाहतुकीची कोंडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:55 AM
येवला : शहरातून जाणारा मनमाड - नगर राज्य महामार्गावर दिवसातून अनेकदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनली आहे.नगर - मनमाड आणि नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे.
ठळक मुद्दे लग्नसराईचा फटका : कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी