चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊ लागल्या आहे. असेच एक सिन्नर तालुक्यात ह्ययेस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटरह्ण असा उपक्रम राबविला जात आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होऊ लागली आहे.औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीच्या अर्थसाहाय्याने सेव द चिल्ड्रन व सी.वाय.डी.ए. या दोन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवला जात आहेत. त्यात आता सिन्नर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्याला रोखण्यासाठी ह्ययेस टू व्हॅक्सिनेशन, नो टू व्हेंटिलेटरह्ण हे अभियान राबवत आहे.यामध्ये सदर संस्थांनी आपल्या स्वयंसेवकांचे गटागटात विभाजन केले व प्रत्येकाला आपापली जबाबदारी ठरवून दिली आहे. तालुक्यात ज्या-ज्या केंद्रावर लसीकरण आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना लसीची माहिती देणे, त्यांची नोदणी करणे, तसेच गर्दीचे योग्य नियोजन करून, तसेच अनेक भागांत नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने लसीबाबत जनजागृती करणे अशी महत्त्वपूर्ण कामे विनामूल्य केली जात आहे. जवळपास ३० हून अधिक गावात हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचा सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांना फायदा झाला आहे. सिन्नर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, प्रकल्प समन्वय योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विनामूल्य सेवा सुरू आहे. त्यासाठी भाऊसाहेब शेळके, विकास म्हस्के, मिताली सुगंधी, अक्षय चिने, विशाल बोबाटकर, ऋतुजा काळे हे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
"येस टू व्हॅक्सिनेशन, नो टू व्हेंटिलेटर"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:25 AM
चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊ लागल्या आहे. असेच एक सिन्नर तालुक्यात ह्ययेस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटरह्ण असा उपक्रम राबविला जात आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होऊ लागली आहे.
ठळक मुद्देअभियान : सिन्नर तालुक्यात जनजागृती