दोन संस्थांच्या माध्यमातून तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘येस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटर’ हे अभियान हाती घेतले आहे. या संस्थांनी स्वयंसेवकांचे गटा-गटात विभाजन केले व प्रत्येकाला जबाबदारी ठरवून दिली. यामध्ये तालुक्यात ज्या ज्या केंद्रांवर आणि तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना लसीची माहिती देणे, त्यांची नोंदणी करणे तसेच गर्दीचे योग्य नियोजन करणे आदी कामे केली जात आहे.सी.वाय.डी.ए. संस्थेचे संचालक प्रवीण जाधव, सिन्नर विभागाचे प्रकल्प समन्वयक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विनामूल्य सेवा देत आहे. संस्थेचे कर्मचारी भाऊसाहेब शेळके, विकास म्हस्के, मिताली सुगंधी, अक्षय चिने, विशाल बोंबटकर, ऋतुजा काळे, सूरज वाघ,अविनाश सोनवणे आदी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
इन्फो ७ हजार नागरिकांना फायदा
‘येस टू व्हॅक्सिन नो टू व्हेंटिलेटर’ उपक्रम सिन्नर तालुक्यातील ३० हून अधिक गावात तसेच शहरात राबविण्यात आला आहे. त्याचा जवळपास ७ हजारांहून अधिक नागरिकांना फायदा झाला आहे. अनेक भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने संस्थेतील स्वयंसेवक लसीबाबत जनजागृती करणे आदी कामे विनामूल्य पार पाडत आहेत. या उपक्रमाचे तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. वैभव गरुड आदींनी कौतुक केले.
फोटो - २३ सिन्नर व्हेंटिलेटर
सिन्नर येथे लसीकरणप्रसंगी सेव्ह द चिल्ड्रन, सी. वाय.डी.ए. संस्थेच्या स्वयंसेवकांसमवेत तहसीलदार राहुल कोताडे, डॉ. मोहन बच्छाव, डॉ. वैभव गरुड आदी.
===Photopath===
230521\23nsk_17_23052021_13.jpg
===Caption===
फोटो - २३ सिन्नर व्हेंटीलेटर सिन्नर येथे लसीकरणप्रसंगी सेव्ह द चिल्ड्रन, सी. वाय.डी. ए. संस्थेच्या स्वयंसेवकांसमवेत तहसीलदार राहुल कोताडे, डॉ. मोहन बच्छाव, डॉ. वैभव गरुड आदी.