विरगाव : संपूर्ण पंचक्र ोशीचे आराध्य दैवत पद्मनाम स्वामी यांच्या समाधी स्थळावर शनिवारी (दि.११) भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१७ व्या शतकापासून अखंडरित्या दरवर्षी होणाऱ्या भागवत सप्ताहाची सांगताही याच दिवशी महाप्रसादाने होणार असून या कार्यक्र माचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. विरगाव येथील कान्हेरी नदीकाठी पद्मनाम स्वामी यांची संजीवन समाधी आहे. पद्मनाम स्वामी यांनी समाजपयोगी संदेश देत १७ व्या शतकापासून या स्थळी भागवत सप्ताहाची सुरु वात केली. या स्थळावर शिवछत्रपतींनी सूरत स्वारीच्या वेळी थांबून मुक्काम केल्याचे शिलालेखही सापडतात. ग्रामीण भागात राहुन धर्मजागृतीसह संस्कृती रक्षणाचे काम पद्मनाम स्वामींनी या कालावधीत केले. आषाढ वद्य अमावस्या या दिवशी स्वामींनी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली. याच दिवसापासून यास्थळी अविरत भागवत सप्ताहाचे व यात्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते.तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत या स्थळाच्या विकासासाठी लाखो रूपयांचा निधी शासन स्तरावरु न मिळल्याने या स्थळाचे रूप पालटले आहे. या स्थळाकडे जाणाºया पायºया, भक्त निवास तसेच प्रसादालय हि कामे यातून पूर्ण करण्यात आली आहेत. याच बरोबर पद्मनाभ स्वामी मित्र मंडळ, ग्रामपंचायत व लोकसह भागाच्या माध्यमातूनही या स्थळी कामे झाल्याने या धार्मिक स्थळाचा विकास होण्यास मोठी मदत झाली आहे.
पद्मनाम स्वामी समाधी स्थळावर शनिवारी यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:49 PM