येवला : शहरात कोरोनोबाधित रुग्णसंख्या सहा झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाच्याही चिंतेत भर पडली आहे. लॉकडाउन व संचारबंदीची अंमलबजावणी कडक केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांशी संबंधित गंभीर असणाऱ्या एकूण २० व्यक्तींना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले आहे, तर लो रिस्क असणाºया ८८ पैकी आठ जणांना बाभुळगाव येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. एकूण ८० व्यक्तींना होम कॉरण्टाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.शहरातील मालेगाव संपर्कात महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गंभीर असलेले नऊ संशयित व्यक्तींना नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. त्यातील पाच संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात चार बालकांचा समावेश आहे.कोरोनाबाधित महिला रुग्ण ज्या खासगी रुग्णालयात गेली होती, त्या रुग्णालयाला सील करण्यात आले असून, रुग्णालयाच्या डॉक्टरसह सात कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करण्यात आले आहे. या सात जणांचे थ्रोट स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांशी संबंधित हायरिस्क असणाºया एकूण २० व्यक्तींना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करण्यात आलेले आहेत. लो रिस्क असणाºया ८८ पैकी ८ जणांना बाभूळगाव येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, एकूण ८० व्यक्तींना होम कॉरण्टाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने येवलेकर चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 8:47 PM