नाशिक : शहरासह जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या येवला तालुक्यातील दंतवाडी येथील अनिता चव्हाण (२७) या महिलेचा सोमवारी (दि़ १०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चव्हाण यांना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या तासाभरात त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान शहरातही स्वाइन फ्लू चांगलाच फैलावला असून, आतापर्यंत ५४ रुग्ण आढळले आहेत़यावर्षी आतापर्यंत १६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून, यामध्ये ग्रामीण भागातील नऊ, शहरातील सहा, तर अहमदनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे़ यामध्ये नाशिक महापालिका हद्दीत ५४ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले असून, यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे़ याबरोबरच नाशिक ग्रामीणमध्ये निफाड तालुक्यातील नऊ रुग्णांपैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ या खालोखाल चांदवड तालुक्यात सहापैकी दोन, येवला तालुक्यात दोन, नाशिक तालुका दोनपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आलेल्या १३ रुग्णांपैकी एकाचा तर खासगी रुग्णालयातील ८९ पैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे़दहा वर्षांत ३१० रुग्णांचा मृत्यूच्स्वाइन फ्लूने गत दहा वर्षांमध्ये १ हजार ६४० रुग्णांपैकी ३१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यात २००९-२२, २०१०-३९, २०११-१, २०१२-२१, २०१३-१९, २०१४-१०, २०१५-८७, २०१६-४, २०१७-९१ तर २०१८ मध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे़
येवल्यातील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:57 AM