मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली वीर, मविप्र महाविद्यालयीन शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.डी.डी.काजळे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ. संजय शिंदे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे, औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.दिलीप डेर्ले, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत बोरसे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.राजाराम कारे, महर्षी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संजय काळोगे यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगाची प्रात्यक्षिके केली. पतंजली योग समिती,नाशिक यांच्या वतीने योगगुरु गोकुळ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बंदावणे, संतोष काळे, प्रतिक खरोटे, राष्ट्रीय योग खेळाडू व मराठा हायस्कूलच्या विद्यार्थिनी स्वानंदी वालझाडे, अनन्या पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली. मुख्याध्यापक गुलाबराव भामरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक पुरुषोत्तम थोरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक यांनी प्रयत्न केले.
फोटो - नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने योग करताना म. वि. प्र. समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, जि.प.च्या शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली वीर, मविप्रचे शिक्षणाधिकारी डाॅ. डी. डी. काजळे, डाॅ. संजय शिंदे, सी. डी. शिंदे,मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे, तसेच आवारातील सर्व प्राचार्य व शिक्षक. (फोटो २३ मराठा)
--
BADGUJAR KAILAS S
LOKMAT MEDIA PVT LTD MOB NO. 9850 889 365
E Mail : badgujar.lokmat@gmail.com
3 Attachments