ेनाशिक : दि. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरसीइ एज्युकेशन, इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॅडिशनल गेम्स अॅण्ड सायन्स, तसेच केटीएचएम कॉलेज बोट क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाण्यातील योगाभ्यासाचे धडे जलतरणपटूंनी गिरविले. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यातील योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक शिरीष प्रभाकर चव्हाण यांनी केले होते. यामध्ये ४१ मुला-मुलींनी सहभाग नोंदवून १५ योगासनांचे अप्रतिम सादरीकरण केले. पाण्यात वृक्षासन, ताडासन, गरु डासन, उत्कटासन, संतुलनासन, नटराजासन, अर्धचंद्रासन अशा विविध प्रकारच्या आसनांचा सराव करण्यात आला.जलतरण प्रशिक्षक व योग अभ्यासक शिरीष चव्हाण यांनी पाण्यात जाऊन भुजंगासन, सेतुबंधासन, कोनासन, सर्वांगासन, वज्रासन यांसारख्या विविध आसनांचे सादरीकरण केले. या कार्यक्र माच्या आयोजनाकरिता निशा चव्हाण, प्रा. योगेश गांगुर्डे, राष्ट्रीय नौकानयन प्रशिक्षक समाधान गवळी, भूषण काकड यांचे सहकार्य लाभले.भारतातील पारंपरिक ठेव्यांमध्ये योग ही सर्वोत्कृष्ट कला जोपासली गेली आहे. जीवनात उपयुक्त असा मोलाचा ठेवा आपल्या संस्कृतीत आहे. जसे आपले योग व पारंपरिक खेळ यांचे महत्त्व जगाला पटले आहेच. ते आपणही आत्मसात करणे आवश्यक आहे. पाण्यातील योगाभ्यासाचे खूप महत्त्वपूर्ण पाऊल आम्ही उचलले आहे.- शिरीष प्रभाकर चव्हाण, योग अभ्यासक, जलतरण प्रशिक्षक.नाशिकचे नाव जलतरण क्षेत्रात आंतररराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. पाण्यातील योगासने या प्रकारच्या प्रयोगांचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. एक्वा एरोबिक या आंतरराष्ट्रीय व्यायाम प्रकारा प्रमाणेच पाण्यातील योगासनांची उपयुक्तता खूप मोठी आहे, म्हणूनच याचा प्रचार-प्रसार होणे आवश्यक आहे.- हरी सोनकांबळे, मुख्य व्यवस्थापक, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव.
जलतरण तलावात गिरविले योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:19 PM
ेनाशिक : दि. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरसीइ एज्युकेशन, इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॅडिशनल गेम्स अॅण्ड सायन्स, तसेच केटीएचएम कॉलेज बोट क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाण्यातील योगाभ्यासाचे धडे जलतरणपटूंनी गिरविले.
ठळक मुद्दे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यातील योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक शिरीष प्रभाकर चव्हाण यांनी केले होते.